जिम जॉइन करण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 09:57 AM2018-09-08T09:57:35+5:302018-09-08T09:57:41+5:30
आता तर केवळ तरुणच नाही तर प्रत्येक वयाचे लोक जिमला जातात. पम जिमला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे.
तरुणांसोबत फिटनेसबाबत काही बोललं तर त्यांचं विश्व जिमजवळ येऊन थांबतं. त्यांना सकाळी उठून चालण्यापेक्षा आणि व्यायाम करण्यापेक्षा जिममध्ये वर्कआऊट करणे जास्त पसंत असते. आता तर केवळ तरुणच नाही तर प्रत्येक वयाचे लोक जिमला जातात. पम जिमला जाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. या गोष्टींची काळजी घेतल्यास जिमचा तुम्हाला अधिक चांगला फायदा होऊ शकतो.
ट्रेनरपासून काही लपवू नका
जिम जॉइन करण्यापूर्वी ट्रेनरला तुमच्या हेल्थबाबत सगळी माहिती द्या. जर तुम्हाला कोणता आजार असेल किंवा तुम्ही काही औषधं घेत असाल तर ते ट्रेनरला सांगा. हेही सांगा कि, जिमला येण्यापूर्वी डेली रुटीन काय असतं.
ट्रेनरचं ऐका
ट्रेनर तुम्हाला जो सल्ला देणार तो पाळा. जिममध्ये येताच काही लोक फार उत्साहाने व्यायाम करु लागतात. हे चुकीचं आहे. याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं.
शरीरानुसार व्यायाम करा
जिममध्ये प्रत्येक वयाचे लोक येतात, त्यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे दुसऱ्यांसारखं करण्याच्या नादात पडू नका. जी एक्सरसाइज दुसऱ्यांसाठी लाभदायक ठरु शकते, ती तुमच्यासाठी घातक ठरु शकते. प्रत्येक एक्सरसाइज योग्य पद्धतीने करा.
डाएटची घ्या काळजी
काही दिवस एक्सरसाइज केल्यावर ट्रेनर तुम्हाला डाएटचा सल्ला देतात. त्यांच्या नियमांना तोडू नका.