डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याआधी फॉलो करा या टिप्स, होईल भरपूर फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:41 PM2021-07-12T12:41:26+5:302021-07-12T12:42:05+5:30

सध्या कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम मुळे अनेक शारीरीक समस्या उद्भभवत आहेत. अनेकांना कामाच्या पद्धतीची सवय झाली आहे पण त्या बरोबरचे आजारही येत आहेत. अशावेळी सर्वात जास्त डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

Follow these tips before endangering eye health, will benefit a lot | डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याआधी फॉलो करा या टिप्स, होईल भरपूर फायदा

डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याआधी फॉलो करा या टिप्स, होईल भरपूर फायदा

Next

सध्या कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम मुळे अनेक शारीरीक समस्या उद्भभवत आहेत. अनेकांना कामाच्या पद्धतीची सवय झाली आहे पण त्या बरोबरचे आजारही येत आहेत. अशावेळी सर्वात जास्त डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच वर्क फ्रॉम होममुळे घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असे दिसून आले आहे. या संकल्पनेमुळे नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत ६४ टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. ७५ टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगतिले. अशा समस्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.अशावेळी तुम्ही या साध्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

संगणक आणि लॅपटॉप पासून अंतर ठेवा
संगणक आणि लॅपटॉपवर काम करत असताना, आपले डोळे आणि स्क्रीन दरम्यान कमीत कमी २० इंचाचे अंतर असले पाहिजे. मोबाईल आणि लॅपटॉपचा निळा प्रकाश टाळण्यासाठी आपण हलका पिवळा प्रकाश किंवा निळा प्रकाश असणारा फिल्टर अ‍ॅप वापरू शकता.
 

डोळ्यांना तेल लावा
रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या डोळ्यांना खोबरेल तेल आणि बदाम तेल मिक्स करून लावा. यामुळे डोळ्यांना आराम आणि थंडपणा मिळेल. रात्री लावलेले तेल सकाळी धुवावे.

डोळे धुवा
वर्क फ्रॉम होम करताना आपण सतत स्क्रीनकडे बघतो. यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यांचा त्रास दूर करण्यासाठी आपण थोड्या-थोड्या वेळाने आपले डोळे धुतले पाहिजेत. यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.

नैसर्गिक ओलावा

डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी तुम्ही कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्यास मदत होते. तसेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते.

 

Web Title: Follow these tips before endangering eye health, will benefit a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.