साधारण डोकेदुखी समजून मायग्रेनकडे दुर्लक्ष करु नका, त्यात 'हे' पदार्थ खाल तर कायमचे पस्तावाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 02:54 PM2021-10-28T14:54:22+5:302021-10-28T14:57:29+5:30

हे. मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे असे त्रास होतात तसेच आवाज आणि प्रकाशाची संवेदनशीलता जाणवते. जर तुम्हाला मायग्रेनच्या समस्येमुळे दीर्घकाळ त्रास होत असेल तर तुम्ही या गोष्टी खाणे टाळावे.

food to avoid if you have migraine, do not eat these foods if you have migraine | साधारण डोकेदुखी समजून मायग्रेनकडे दुर्लक्ष करु नका, त्यात 'हे' पदार्थ खाल तर कायमचे पस्तावाल

साधारण डोकेदुखी समजून मायग्रेनकडे दुर्लक्ष करु नका, त्यात 'हे' पदार्थ खाल तर कायमचे पस्तावाल

googlenewsNext

जगात डायबे‌टिस व दमा या पेशंटांपेक्षाही मायग्रेनचे पेशंट अधिक प्रमाणात आढळतात. पण, तरीही मायग्रेनविषयी फारशी जागृती नाही. सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि केम‌स्टिकडून औषधे घेऊन तात्पुरता दिलासा मिळवतात. पण मायग्रेन हा निव्वळ डोकेदुखीच्या पलिकडे जाणार आजार आहे. मायग्रेनमुळे तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे असे त्रास होतात तसेच आवाज आणि प्रकाशाची संवेदनशीलता जाणवते. जर तुम्हाला मायग्रेनच्या समस्येमुळे दीर्घकाळ त्रास होत असेल तर तुम्ही या गोष्टी खाणे टाळावे.

चॉकलेट - तज्ञांच्या मते, चॉकलेटमध्ये कॅफीन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन दोन्ही असते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. शिवाय, अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या अभ्यासानुसार, चॉकलेट हे अल्कोहोलनंतर मायग्रेनसाठी दुसरे सर्वात मोठे कारण आहे.

कॅफिन - बहुतेक लोक चहा आणि कॉफीचे सेवन करतात. परंतु ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी ते पदार्थ टाळावे कारण या दोन्ही पेयांमधील असणाऱ्या कॅफिनमुळे मायग्रेन होऊ शकतो.

जूने चीज - तज्ञांच्या मते, जून्या चीजमध्ये टायरामाइन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे मायग्रेन होऊ शकतो. फेटा, ब्लू चीज आणि परमेसनमध्ये टायरामाइन भरपूर प्रमाणात असते.

लोणचे - जुने चीज प्रमाणेच, लोणच्यामध्ये देखील टायरामाइनचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे मायग्रेनचा हल्ला होऊ शकतो.

Web Title: food to avoid if you have migraine, do not eat these foods if you have migraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.