मानसिक आरोग्यासाठी 'या' पदार्थांना नाही म्हणाल तर आयुष्यभर पस्तावाल; फायदे वाचून व्हाल चकित!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:55 PM2021-09-05T12:55:41+5:302021-09-05T13:00:02+5:30

आपण शरीर स्वास्थ्यासाठी अनेक गोष्टी खातो. पण मानसिक स्वास्थ्य आणि मेंदुच्या आरोग्यासाठी काय करतो? याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठीच आहे.

food for healthy mind and sharp memory, eat theses foods for psychological health benefits | मानसिक आरोग्यासाठी 'या' पदार्थांना नाही म्हणाल तर आयुष्यभर पस्तावाल; फायदे वाचून व्हाल चकित!

मानसिक आरोग्यासाठी 'या' पदार्थांना नाही म्हणाल तर आयुष्यभर पस्तावाल; फायदे वाचून व्हाल चकित!

Next

आपण शरीर स्वास्थ्यासाठी अनेक गोष्टी खातो. पण मानसिक स्वास्थ्य आणि मेंदुच्या आरोग्यासाठी काय करतो? याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर पुढील माहिती ही तुमच्यासाठीच आहे. उत्तम मानसिक स्वास्थ्य व स्मरणशक्तीसाठी तुम्ही खालील पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.

कडधान्य आणि सुकामेवा : मूठभर बियाणे आणि सुकामेवा तुमची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त भरपूर प्रमाणात असते जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मोठी भूमिका बजावते. मेंदूच्या आकाराचे अक्रोड हे ओमेगा -3 आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे असलेले इतर आवश्यक पोषक घटकांचे चांगले स्त्रोत आहे. सूर्यफूल बियाणे व्हिटॅमिन ई चे चांगले स्रोत आहेत. अगदी शेंगदाण्यात व्हिटॅमिन ई असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे.

हिरव्या भाज्या : ब्रोकोली, पालक, शेपू, मेथी असा हिरव्या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे ई, के आणि बी 9 (फोलेट) समृध्द असते आणि मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन सी सारख्या फायटोन्यूट्रिएंट्स महत्वाच्या असतो. व्हिटॅमिन के मानसिक सतर्कता वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

अवोकॅडो : व्हिटॅमिन ई मध्ये समृद्ध, अवोकॅडोमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूला निरोगी आणि सतर्क ठेवण्यास मदत करतात. क्रिमी अवोकॅडो देखील अल्झायमरचा धोका कमी करण्याशी मदत करतो.


धान्य :
 संपूर्ण धान्य हे उर्जेचे शक्तीस्थान मानले जाते आणि आपल्याला अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. फायबर युक्त संपूर्ण धान्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते, जे मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते आणि आपल्याला सतर्क ठेवते.


ब्रेकफास्ट:
ब्रेकफास्टमध्ये प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा. आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा. सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे.

Web Title: food for healthy mind and sharp memory, eat theses foods for psychological health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.