परफेक्ट अॅब्स हवे असतील हे पदार्थ हे पदार्थ खाणं टाळा, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:50 AM2019-07-16T10:50:41+5:302019-07-16T11:01:43+5:30
झीरो बॉड फॅटसोबत अॅब्स असणं आता ट्रेंन्ड बनत आहे. यासाठी केवळ मुलंच नाही तर मुलीही जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत.
आजकाल तरूणाईमध्ये फिटनेसची चांगलीच क्रेझ वाढलेली बघायला मिळेत. अनेकजण खासकरून अॅब्स बनवण्यावर अधिक जोर देतात. झीरो बॉड फॅटसोबत अॅब्स असणं आता ट्रेंन्ड बनत आहे. यासाठी केवळ मुलंच नाही तर मुलीही जिममध्ये जाऊन घाम गाळत आहेत. पण असे काही फूड आयटम्स आहेत, ज्यामुळे तुम्ही अॅब्स मिळवू शकणार नाहीत. म्हणजे हे फूड अॅब्सच्या मधे बाधा ठरतात.
स्वीट ड्रिंक्स
सोडा, स्पोर्ट्स ड्रिंक्स, पॅक्ड ज्यूस सारखे पेय गोड करण्यासाठी त्यात सारख मिश्रित केली जाते. याने बॉडी फॅट वाढण्यासोबतच वेगाने वजनही वाढतं. त्यामुळे याने फॅट बर्निंगची प्रक्रिया सुद्धा हळू होते. अशात पोटाच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी कमी होऊ शकत नाही.
फ्रोजन फूड
(Image Credit : Mental Flos)
फ्रोजन किंवा रेडी टू मेड फूड तुमचं स्वयंपाक करण्याचं काम सोपं करतात. पण या पदार्थांमध्ये कॅलरी आणि फॅट भरपूर असतात. सोबतच यांचं लाइफ वाढवण्यासाठी यात टाकले जाणारे काही तत्व सुद्धा वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात.
मद्यसेवन
(Image Credit : CTV News)
तुम्ही कधी बीअर बेली हा शब्द ऐकलाय? जास्त बीअर किंवा मद्यसेवन केल्याने पोटावरील समस्या अधिक वाढते. याने आरोग्यासही अनेक प्रकारचे नुकसान होतात. धक्कादायक बाब म्हणजे मद्यसेवनाने तयार झालेली चरबी कमी करणे फार कठीण काम असतं. चांगल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी मद्यसेवन वेळीच थांबवणे बरं ठरेल.
गोड पदार्थ
(Image Credit : Reader's Digest)
गोड पदार्थ खाणं कितीही पसंत असू द्या, पण अॅब्स हवे असतील तर याचा मोह तुम्हाला टाळावाच लागेल. कुकीज, कॅंडी, केक, मिठाई सारख्या पदार्थांमध्ये साखर थेट किंवा फ्रुक्टोजच्या फॉर्ममध्ये असते. याने भूक वाढते. म्हणजे साखरेने वजनही वाढेल आणि जास्त लागणारी भूक तुम्हाला वर्कआउट करण्यासही रोखेल.
रिफाइन्ड ग्रेन्स
(Image Credit : Chosen Recipes )
रिफाइन्ड ग्रेन्सपासून तयार पदार्थ जसे की, पांढरे तांदूळ, पास्ता, व्हाइट ब्रेड यातून प्रॉडक्शनदरम्यान पौष्टिक तत्व नष्ट होतात. त्यामुळे यात ना फायबर राहत ना मिनरल्स, व्हिटॅमिन्स किंवा इतरही तत्व राहत नाहीत. हेच कारण आहे की, हे पदार्थ लवकर पचतात आणि यानेच फॅट वाढतात.