सावधान! 'या' खाद्यपदार्थांबाबत अनेक कंपन्यांकडून केले जातात खोटे दावे; वेळीच आरोग्य सांभाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:33 PM2020-09-18T15:33:15+5:302020-09-18T15:35:16+5:30
कोणकोणते पदार्थ विकत घेताना तुमची फसवणूक होऊ शकते याबाबत सांगणार आहोत.
खाद्यापदार्थांबाबत अनेक कंपन्यांकडून उत्पादनं दर्जेदार असल्याचा दावा केला जातो. अनेकदा हे दावे पूर्ण खरे नसतात. कधीकधी कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती घेऊ नये याबाबत संभ्रमाचं वातावरण ग्राहकांमध्ये निर्माण झालेलं असतं. काही वस्तू विकत घेताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं असतं. जेणेकरून तुम्हाला पदार्थांची गुणवत्ता कळण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला कोणकोणते पदार्थ विकत घेताना तुमची फसवणूक होऊ शकते याबाबत सांगणार आहोत.
मध
मध आरोग्यासाठी अतिशय गुणकारी समजलं जातं. पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मधात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे गुण असल्यामुळे अनेकजण दिवसातून एकदातरी मधाचं सेवन करतात. मधात अनेक एंटी बायोटिक्सचा वापर केला जातो. त्यामुळे मधाची गुणवत्ता कमी होऊन तुमच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो.
मसाले
तुम्हाला माहिती आहे का?, जेव्हा तुम्ही कोणत्याही सुपर मार्केटमधून मसल्याचा डब्बा विकत घेता तेव्हा त्यात अनेक आर्टिफिशिल फ्लेवर्स आणि रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी मसाल्याचे पदार्थ किंवा मसाला विकत घेताना पाकिटावरील मजकूर नक्की वाचा.
व्हाईट चॉकलेट
व्हाईट चॉकटेल खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात. अनेक उत्पादनांमध्ये चॉकलेट तयार करण्यासाठी जवळपास १० टक्के चॉकलेट लिक्विअर आणि कोकोआ बटर आणि बीन्सचा वापर केला जातो. त्यामुळे नेहमी चॉकलेट कंपाऊड विकत घेताना पाकिटावरील मजकूर वाचूनच विकत घ्या. अनेकदा तेल विकत घेतानाही फसवणूकीचा सामना करावा लागू शकतो. भेसळयुक्त तेल अनेक कंपन्याकडून विकत घेतले जाते. म्हणून विकत घेण्याआधी खात्री करून घ्या.
फळांचा रस
जेव्हा तुम्ही हवाबंद कॅन किंवा डब्यातून ज्यूस विकत घेता तेव्हा असा फळांचा रस हा पूर्णपणे फळांपासून तयार झालेला नसून त्यात वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि रंगाचा, आर्टीफिशियल साखरेचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात अशा केमिकल्सयुक्त ज्यूसचं सेवन केल्यानं वजन वाढणं, डायबिटिस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून शक्यतो ताज्या फळांच्या रसाचे सेवन करा. केमिकल्सयुक्त फळांच्या रसामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकतं म्हणून कंपन्याच्या दाव्याला बळी न पडता शरीराला पोषण मिळवून देत असलेल्या ताज्या पदार्थांचे सेवन करा.
हे पण वाचा-
भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध