चुकूनही पेपरमध्ये पदार्थ खाऊ नका, होतो कॅन्सरचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 10:09 AM2019-01-26T10:09:41+5:302019-01-26T10:11:15+5:30
तुम्हीही रस्त्याचा कडेला असलेल्या ठेल्यावर अनेकदा पेपरच्या कोनमध्ये विकली जाणारी भेळ, चाट आणि चणे खाल्ले असतील.
अनेकांना स्ट्रीट फूड खाण्याची सवय असते. तुम्हीही रस्त्याच्या कडेला असलेल्या ठेल्यावर अनेकदा पेपरच्या कोनमध्ये विकली जाणारी भेळ, चाट आणि चणे खाल्ले असतील. वडापाव आणि भजीरी याच पेपरमध्ये दिले जातात. हे पदार्थ खाताना भलेही तुम्ही याचा विचार करत नसाल की, दुकानदार तुम्हाला कोणत्या आणि कशा पेपरमध्ये खायला देतात. पण आता तुम्हाला याची काळजी घेण्याची गरज आहे.
FSSAI ने जारी केली सूचना
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण अशाप्रकारे न्यूजपेपरमध्ये ठेवून पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यामुळे फूड सेफ्टी अॅन्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच FSSAI एका सूचना जाहीर केली आहे. आणि त्यानुसार न्यूजपेपर आणि प्लास्टिकवर पदार्थ देण्यावर मनाई केली आहे.
कॅन्सरचा धोका
फूड अथॉरिटीनुसार, न्यूजपेपरमध्ये पदार्थ खाणे अनेकप्रकारे जीवघेणं ठरू शकतं. कारण न्यूजपेपरच्या शाईमध्ये मल्टिपल बायोअॅक्टिव मटेरिअल असतं. ज्याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. ही शाई शरीरात गेल्यावर कॅन्सरसहीत इतरही जीवघेणे आजार होऊ शकतात.
तेल काढण्यासाठीही पेपरचा वापर नको
FSSAI नुसार भारतातील लोक कळत-नकळत स्लो पॉयझनचे शिकार होत आहेत. कारण देशात मोठ्या प्रमाणात छोट्या हॉटेल्ससहीत रस्त्यावरील ठेल्यांवर आणि घरांमध्येही पदार्थ ठेवण्यासाठी न्यूजपेपरचा वापर केला जातो. लोकांचा असा समज असतो की, पेपरचा वापर केल्याने पदार्थांमधील तेल शोषलं जातं. पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे.