या न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेमुळे नजर होते कमजोर, काळजी घेतली नाही तर लागेल चष्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 09:58 AM2022-10-01T09:58:37+5:302022-10-01T09:59:15+5:30
Weak Eyesight: डोळ्यांसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक, ल्यूटिन आणि जेक्सेन्थिनसारखे पोषक तत्व चांगले असतात.
Weak Eyesight: डोळ्यांशिवाय आयुष्यात फक्त अंधारच राहील. त्यामुळे तुम्हाला जर असं जाणवत असेल की, तुमची नजर कमजोर झाली आहे किंवा तुम्हाला कमी दिसतंय तर समजून घ्या की, तुमच्यात काही न्यूट्रिएंट्सची कमतरता आहे. यावर वेळीच उपाय करा नाही तर तुम्हाला चष्मा लागू शकतो. तुमच्या डेली डाएटमध्ये पावरफुल व्हिटॅमिन्स, एंटीऑक्सिडेंट आणि मिनरल्सचा समावेश करा. ज्याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी चांगली होईल. अनेक शोधातून हे समोर आलं आहे की, डोळ्यांसाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक, ल्यूटिन आणि जेक्सेन्थिनसारखे पोषक तत्व चांगले असतात.
न्यूट्रिएंट्स डोळ्यांसाठी किती फायदेशीर
ल्यूटिन आणि जेक्सेन्थिन
अनेक शोधातून समोर आलं की, ल्यूटिन आणि जेक्सेन्थिन कोरोनिक आय डिजीजचा धोका कमी करतात. ज्या लोकांना सगळ्यात जास्त ल्यूटिन आणि जेक्सेन्थिन मिळालं, त्यांच्या मोतिबिंदू विकसित होण्याचा धोका फार कमी होता. यासाठी हिरव्या पालेभाज्याशिवाय ब्रोकोली, मक्का, मटर आणि कीनू खा.
व्हिटॅमिन सी
अनेक अभ्यासक सांगतात की, व्हिटॅमिन सी मोतिबिंदूचा धोका कमी करतं आणि जेव्हा हे इतर पोषक तत्वांसोबत सेवन केलं तर याने दृष्टी जास्त वयातही चांगली राहते. ब्लर व्हिजनचा धोकाही कमी होतो. यासाठी तुम्ही ऑरेंज, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई, हिरव्या मिरच्या, टोमॅटो आणि लिंबूचं सेवन करा.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई डोळांमधील कोशिकांना मॉलिक्यूल्स आणि फ्री रॅडिकल्सपासून वाचवतं. जे हेल्दी सेल्स तोडण्याचं काम करतात. व्हिटॅमिन ई साठी वनस्पती तेल, नट्स, गहू आणि रताळ्याचं सेवन करा.
एसेंशिअल फॅटी अॅसिड
चांगलं व्हिजुअल डेव्हलपमेंट आणि रेटिनाच्या फंक्शनसाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड फार महत्वाचं आहे. प्री-टर्म आणि फुल-टर्म इनफॅट्सवर शोधातून समोर समजलं की, ऑप्टिमल व्हिजुअल डेवलपमेंटसाठी डाएटमध्ये पुरेसा ओमेगा फॅटी अॅसिड असणं गरजेचं आहे.