निरोगी फुफ्फुसांसाठी या पदार्थांचं करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:38 AM2018-09-18T11:38:20+5:302018-09-18T11:38:32+5:30
चुकीच्या आहारामुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसांसंबधी वेगवेगळे आजार जसे की, टीबी, अस्थमा, फुफ्फुसांचा कॅन्सर हे होऊ शकतात.
फुफ्फुसे आपल्या शरीराचं महत्त्वपूर्ण अंग आहे. याव्दारे आपण श्वास घेतो. फुफ्फुसांचं काम वातावरणातून ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. हे ऑक्सिजन रक्ताव्दारे हृदयापर्यंत पोहोचतं. त्यामुळे फुफ्फुसांची काळजी घेणे गरजेचं आहे.
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा प्रभाव फुफ्फुसांवर पडतो. चुकीच्या आहारामुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसांसंबधी वेगवेगळे आजार जसे की, टीबी, अस्थमा, फुफ्फुसांचा कॅन्सर हे होऊ शकतात. पण काही गोष्टींची आधीच काळजी घेतली तर या समस्या रोखल्या जाऊ शकतात.
व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ
फुफ्फुसांसाठी व्हिटॅमिन सी फार फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी एकप्रकार चं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन शरीराच्या सर्वच अंगांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतं. सर्वच आंबट फळांमद्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे संत्री, लिंबू, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, अननस आणि कैरी ही फळे भरपूर खावीत. व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात.
लायकोपेन असलेला आहार
फुफ्फूसांसाठी लायकोपेनयुक्त आहार करणे फायदेशीर ठरतं. कारण या आहारामध्ये कॅरोटीनॉयड असतं. हे एकप्रकार असं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे जे अस्थमापासून बचाव करतं. आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो. लायकोपेन मिळवण्यासाठी टोमॅटो, गाजर, कलिंगड, पपई तसेच हिरव्या भाज्या खाव्यात.
लसणानेही होतो फायदा
लसणाला कफनाशक मानलं जातं. जेवण केल्यानंतर लसणाचं सेवन केल्यास छाती चांगली राहते आणि अनेक रोगांपासून बचाव होतो. लसणामध्ये अॅलिसीन असते जे आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यासोबतच लसणामध्ये अनेक अॅटी-ऑक्सिडेंट्स असतात जे संक्रमणापासून बचाव करतात. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अस्थमाच्या रुग्णांनी आहारात आवर्जून लसणाचा समावेश करावा.
मनुका
मनुक्याचे १५ दाणे रात्री पाण्यात भिजवा. सकाळी उठून ते मनुके खावे आणि ज्यात मनुके भिजवले होते ते पाणी प्यावे. एक महिना याने सेवन केल्यास फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहतं.
तुळशीची पाने
तुळशीची पाने, काथ, कापूर आणि वेलची समान प्रमाणात घेऊन त्यात थोडी साखर घालून मिश्रण बारीक करा. हे मिश्रण दिवसातून दोनदा थोडं खावे. याने फुफ्फुसात जमा झालेला कफ मोकळा होईल.