बदलत्या वातावरणात वायरल इन्फेक्शनपासून कसा कराल बचाव? जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:20 PM2024-04-22T12:20:30+5:302024-04-22T12:21:07+5:30
Viral Infection : यांपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामुळे वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळेल आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.
Viral Infection : बदलत्या वातावरणात वायरल इन्फेक्शनचा धोका वाढत असतो. सामान्यपणे वातावरणात होत असलेल्या बदलामुळे व्हायरस अॅक्टिव होतात. हे व्हायरस नाक, घशात, फुप्फुसात आणि छातीत प्रवेश करतात आणि काही तासांमध्य शरीराला संक्रमित करतात. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप येतो.
त्यामुळे सतत बदलत असलेल्या वातावरणात वायरल इन्फेक्शनचा धोका नियंत्रित करण्यासाठी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार यांपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामुळे वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळेल आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.
लसूण
लसणाच्या सेवनाने तुमचा वायरल इन्फेक्शनसहीत अनेक आजारांपासून बचाव होतो. लसणांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी वायरल आणि अॅंटी फंगल तत्व असतात. जे वेगवेगळ्या संक्रमणासोबत लढण्यास मदत करतात. यातील अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी फंगल प्रॉपर्टीज आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात.
मध आणि आले
मध आणि आल्याचं सेवन केल्याने तुम्हाला वायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळते. आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे कोल्ड आणि फ्लूपासून बचाव करण्यासोबतच घशातील खवखवही दूर करतात. मधामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअम आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. जे संक्रमण रोखण्यास आणि इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात.
तुळशी आणि काळे मिरे
काळे मिरे आणि तुळशीचं सेवन केल्याने संक्रमणासोबत लढण्यास मदत मिळते. तुळशीने आपल्या शरीराची इम्यूनिटी वाढते ज्यामुळे वायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. याने कोल्ड आणि कफही दूर होतो. काळ्या मिऱ्यांमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी बायोटीक गुण असतात. याने इम्यूनिटी बूस्ट होते.
आवळा
आवळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. हिवाळ्यात याचा डाएटमध्ये समावेश करणं चांगलं असतं. याने इम्यूनिटी वाढण्यासोबतच डायजेशनही सुधारतं. तसेच वायरल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
हळद
कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी हळदीचं सेवन रामबाण उपाय ठरतं. यात अॅंटी-वायरल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात. इन्फेक्शनसोबत लढल्यावर इम्यूनिटी मजबूत होते आणि वायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.