Migraine : मायग्रेनची समस्या आणखी वाढवण्यास जबाबदार असतात 'हे' पदार्थ, वेळीच यांच सेवन थांबवा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:17 PM2022-02-11T17:17:29+5:302022-02-11T17:19:55+5:30
असे काही पदार्थ आहेत जे मायग्रेनला चालना देतात. या पदार्थांपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या टाळता येऊ शकते.
मायग्रेन (Migraine) ही एक समस्या आहे जी आपल्या खराब जीवनशैली आणि आहारामुळे उद्भवते (Trigger). वास्तविक, आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. मायग्रेनच्या समस्येमध्ये अन्नाचाही मोठा वाटा असतो. मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे ज्यामध्ये उलट्या होणे, अस्वस्थता, प्रकाश आणि मोठ्या आवाजाची संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्तीच्या पलिकडे जाते.
मेडटेकनुसार, हा एक प्रकारचा मेंदू विकार असून जो ३५ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये वेगाने विकसित होतो. डब्ल्यूएचओच्या मते, हा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो जो मुख्यतः हार्मोनल प्रभावामुळे होतो. OnlyMyHealth नुसार, असे काही पदार्थ आहेत जे मायग्रेनला चालना देतात. या पदार्थांपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या टाळता येऊ शकते.(Foods That Trigger Migraine)
मायग्रेनला चालना देणारे पदार्थ
कॅफिनयुक्त पेये (Caffeinated Beverages)
अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनच्या मते, कॅफीन मायग्रेन अटॅक टाळण्यास मदत करू शकते. पण जर तुम्ही चहा, कॉफी यासारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळे मायग्रेनची समस्याही वाढू शकते.
आर्टिफिशियल स्वीटनर्स (Artificial Sweeteners)
बाजारात अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध आहेत ज्यात कृत्रिम गोडवा वापरला जातो. अशा पदार्थांचा आहारात सतत समावेश केल्याने मायग्रेनची समस्या वाढू शकते. (Foods That Trigger Migraine)
चॉकलेट (Chocolate)
चॉकलेटमध्ये कॅफिन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढू शकते.
मोनोसोडियम ग्लुटामेट (Monosodium Glutamate)
मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) ग्लुटामिक अॅसिड हे एक सोडियम मीठ आहे ज्याचे जास्त सेवन केल्याने ही समस्या उद्भवू शकते. हे पॅके केलेले पदार्थ, चायनीज पदार्थ, पॅके केलेले सूप इत्यादींमध्ये आढळते.
लोणचे आणि फर्मेटेड फूड्स (Pickles And Fermented Foods)
जर तुम्ही लोणचे, फर्मेटेड फूड्स आणि मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.
अशा खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात टायरामाइन असू शकते ज्यामुळे मायग्रेन होऊ शकते.
फ्रोजन फूड्स (Frozen Foods)
आईस्क्रीम, पॅक केलेले फास्ट फूड इत्यादींचे सेवन केल्याने देखील मायग्रेन होऊ शकतो.
सॉल्टी फूड (Salty food)
मीठयुक्त प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
त्यामध्ये उच्च प्रमाणात सोडियम असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि मायग्रेन अटॅक येऊ शकतो.