संत्रीसोबत कधीच चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, जीवघेणं ठरू शकतं हे कॉम्बिनेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 02:30 PM2024-02-12T14:30:41+5:302024-02-12T14:31:50+5:30
आयुर्वेदानुसार, आंबट फळांमध्ये सिट्रिक अॅसिड असल्याने काही फूड्ससोबत याचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात उष्णता वाढू शकते.
आंबट फळं खाण्याची अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. पण यात सिट्रिक अॅसिड असल्याने यांचं काही गोष्टींसोबत सेवन करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, जर तुम्हाला स्वत:ला हेल्दी ठेवायचं असेल तर आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करावा. कारण फळांच्या माध्यमातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि हेल्थ बुस्टींग अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. खासकरून सिट्रस फ्रूट्स, जसे की, संत्री, कीवी, लिंबू, मोसंबी यांमध्ये फायबर, मायक्रोनूट्रिएंट्स, फ्लवोनोइड अॅंटी-ऑक्सीडेंट असल्याने आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते. सोबतच बदलत्या वातावरणातील आजारांचा धोकाही कमी राहतो.
आयुर्वेदानुसार, आंबट फळांमध्ये सिट्रिक अॅसिड असल्याने काही फूड्ससोबत याचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात उष्णता वाढू शकते सोबतच पाण्याचं संतुलनही बिघडू शकतं. अशात तुम्हाला आंबट फळांचा फायदा मिळवायचा असेल तर या गोष्टींसोबत त्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
दूध
दूध एक कॉम्प्लेक्स डाएट असल्याने पचनास समस्या होते. अशात जर यासोबत तुम्ही आंबट फळांचं सेवन कराल तर तुम्हाला अन्न पचवण्यास समस्या होईल. सोबतच दुधात आवश्यक पोष तत्व अवशोषणातही समस्या होते.
काकडी-कलिंगड
काकडी, कलिंगड, खरबूज यांमध्ये पाणी भरपूर असतं. पण जेव्हा तुम्ही यांचं सेवन आंबट फळांसोबत करता तेव्हा यामुळे शरीरात जास्त उष्णता वाढल्याने अॅसिडिटी वाढते आणि पोटात जडपणाही वाढतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन टाळलं पाहिजे.
स्टार्ची फूड
जेव्हा तुम्ही आंबट फळं भात, बटाट्यांसोबत खाण्याची चूक करता तेव्हा याने तुमचं पचन तंत्र बिघडतं. कारण स्टार्च आणि आंबट फळांमध्ये असलेल्या सिट्रिक अॅसिडमुळे तुम्हाला अन्न पचवण्यास समस्या होते. सोबतच यामुळे नूट्रिएंट्सही योग्यपणे अवशोषित केले जात नाही. ज्यामुळे शरीराला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होतात.
पपईसोबत
पपई आणि आंबट फळं सोबत खाणं कुणालाही आवडेल. तसेच जेव्हा यात लिंबू आणि मीठ टाकून खाल्लं जातं तेव्हा आनंद डबल होईल. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, पपईमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि जेव्हा तुम्ही यात लिंबाचा रस टाकता तेव्हा याने तुमच्या पचन तंत्राची स्थिती बिघडते. अनेकदा यामुळे छातीत जास्त जळजळ होते. त्यामुळे पपईसोबत सिट्रस फ्रूट्सचं कॉम्बिनेशन चुकूनही करू नका.