पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:42 AM2023-01-10T11:42:27+5:302023-01-10T11:42:37+5:30

Piles Symptom : हा आजार एकदा बरा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. अशात पाइल्सची समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे.

Foods to avoid if you have piles these quick tips will help in Bawasir | पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे...

पाइल्सची समस्या असेल तर काय खाऊ नये? जाणून घ्या पाइल्सची लक्षणे...

googlenewsNext

Piles Symptom : कोणत्याही आजाराचं मुख्य कारण असतं आपल्या चुकीच्या सवयी. खासकरून पाइल्सची समस्याही याच कारणामुळे होते. या आजाराचा आपल्या पचनक्रियेशी विशेष संबंध असतो. जर पचनक्रियेत कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर तर सर्वातआधी पोटदुखी सुरू होते, पुन्हा पुन्हा टॉयलेटला जावं लागतं नैसर्गिक विधी करताना जोर लावावा लागतो आणि यामुळेच पाइल्सची समस्या होते. 

हा आजार एकदा बरा झाल्यावर पुन्हा होऊ शकतो. अशात पाइल्सची समस्या असलेल्या लोकांनी त्यांच्या खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. चला जाणून घेऊ पाइल्सची समस्या असताना रूग्णाने कोणते पदार्थ खाणे टाळावे. त्याआधी जाणून घेऊ पाइल्स होण्याची मुख्य कारणे....

- पोट बिघडणं

- एकाच स्थितीत सतत बसणे

- जास्त वेळ उभं राहणं

- लठ्ठपणा

- मद्यसेवन

- नैसर्गिक विधीसाठी जोर लावावा लागणं

- फायबरची कमतरता

- आनुवांशिक कारण

काय खाऊ नये?

पाइल्सने पीडित लोकांनी फास्ट फूडला चार हात दूरच ठेवलं पाहिजे. त्याऐवजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. पाइल्स समस्या कमी करण्यासाठी पत्तीगोबी, बीट, टोमॅटो इत्यादींचा आहारात समावेश करावा.

लाल किंवा हिरवी मिरची

पाइल्सची समस्या झाल्यावर तिखट अजिबात खाऊ नये. कारण तिखटामुळे पाइल्सच्या जखमा कमी होत नाहीत. इतकेच नाही तर पाइल्सच्या सुकलेल्या जखमा तिखटामुळे पुन्हा सक्रिय होतात. त्यासोबतट चटपटीत, मसालेदार, गरम पदार्थही खाऊ नयेत.

बाहेरचे पदार्थ

पाइल्सने पीडित लोकांनी शक्य तेवढं बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. कारण बाहेरच्या पदार्थांमध्ये मिरची, तिखट, मीठ असतं आणि स्वच्छतेची फार काळजीही घेतली जात नाही. याने तुम्ही पाइल्सची समस्या अधिक वाढू शकते.

पाइल्सची लक्षणे

- शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे

- शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे

- शौचाच्या ठिकाणी खाज येणे

Web Title: Foods to avoid if you have piles these quick tips will help in Bawasir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.