शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी खास उपाय, रोज कराल तर मिळतील अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:35 PM2023-09-25T12:35:08+5:302023-09-25T12:35:56+5:30

Good Cholesterol : जर शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर ते आपल्या धमण्यांमध्ये जमा होऊ लागतं. यालाच हाय कोलेस्ट्रॉल असं म्हणतात.

Foods to maintain good cholesterol levels in your body | शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी खास उपाय, रोज कराल तर मिळतील अनेक फायदे!

शरीरात गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी खास उपाय, रोज कराल तर मिळतील अनेक फायदे!

googlenewsNext

Good Cholesterol : कोलेस्ट्रॉल हा शब्द आता सगळ्यांनाच समजला आहे. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो हेही सगळ्यांना माहीत आहे. पण शरीरात नवीन कोशिका आणि गरजेचे हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. पण जर शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर ते आपल्या धमण्यांमध्ये जमा होऊ लागतं. यालाच हाय कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. ज्यामुळे अनेक समस्या होतात. स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे हाय कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागतो. अशात गरजेचं हे आहे की, आपण एक हेल्दी लाइफस्टाईल मेंटेन करावी. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबाबत सांगणार आहोत, ज्यांचं सेवन करून तुम्ही शरीरातील हाय कोलेस्ट्रॉलची लेव्हल मॅनेज करू शकता. या गोष्टी शरीरात गुड कोलेस्ट्रॉलची लेव्हल मेंटेन ठेवू शकतात. 

ओटमील - ओटमीलमध्ये सॉल्यूबल फायबर असतं. डे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यास मदत करतं. कोलेस्ट्रॉल रक्तात मिक्स होण्यापासून रोखण्यासाठी सॉल्यूबल फायबर याला डायजेस्टिव टॅक्टमध्ये बांधून ठेवतं.

नट्स - बदाम, अक्रोड आणि शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतं. नट्सचं सेवन केल्याने गुड कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं.

डाळी - बीन्स आणि डाळींमध्ये सॉल्यूबल फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं. याने ब्लड शुगर लेव्हल सुधारण्यास आणि बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.

फळं आणि भाज्या - फळं आणि भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण फार जास्त असतं. सोबतच यात कॅलरी आणि फॅटही कमी असतं. वेगवेगळ्या फळांचं सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते आणि गुड कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते.

Web Title: Foods to maintain good cholesterol levels in your body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.