हृदयरोगापासून वाचवतात 'या' गोष्टी, हार्ट अटॅकची येऊ देत नाहीत वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 09:59 AM2024-04-09T09:59:00+5:302024-04-09T09:59:26+5:30
Heart diseases :तुम्हाला जर खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी असतील तर लहानांसोबतच मोठ्यांनाही हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या होतात. ज्या तुमच्यासाठी जीवघेण्या ठरू शकतात.
Heart diseases : हेल्दी डाएट आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. आपण जे खातो तसा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तुम्हाला जर खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी असतील तर लहानांसोबतच मोठ्यांनाही हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या होतात. ज्या तुमच्यासाठी जीवघेण्या ठरू शकतात.
हार्ट डिजीज अशा कंडीशनला म्हटलं जातं ज्यात हृदयावर प्रभाव पडतो. तुम्ही जर चांगला आहार घेतला तर तुमचा हृदयरोगांचा धोका कमी होतो. इतकंच नाही तर याने शरीराला इतरही वेगवेगळे जसे की, वजन कमी करणे, डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. अशात चांगला आहार म्हणजे काय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
फळं आणि भाज्या
वेगवेगळी फळं आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. या गोष्टी कमी कॅलरी असण्यासोबतच यांमध्ये फायबर अधिक असतं. फळं आणि भाज्यांमध्ये असे अनेक तत्व असतात जे कार्डियोवस्कुलर डिजीजपासून बचाव करण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात नियमितपणे फळं आणि भाज्यांचा समावेश करावा.
कडधान्य
कडधान्यांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक तत्व भरपूर असतात. जे ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे कडधान्याचं सेवन केलं पाहिजे. रिफाइंड धान्य टाळलं पाहिजे.
अळशीच्या बीया
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं जसे की, आला लिनोलेनिक अॅसिड. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचं आहे. तसेच अळशीमध्ये असलेलं सॉल्यूबल आणि इसॉल्यूबल फायबर वजन कंट्रोल करण्यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं.
बदाम
हार्टसाठी हेल्दी नट्समध्ये बदाम फार फायदेशीर ठरतं. यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन इ, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, फायबर आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात. त्यामुळे बदामाचं नियमित सेवन केलं पाहिजे.
जेव्हाही आपण ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांचा विचार करतो तेव्हा सर्वातआधी विचार मिठाचा येतो. त्यामुळे अनेकजण कमी मीठ असलेली डाएट घेतात. पण हा विचार करणं चुकीचं ठरेल की, सोडिअम कमी केल्याने हृदयाला धोका होत नाही.
मिठाचा हृदयावर काय होतो परिणाम?
सोडिअमचं सेवन कमी केल्याने काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. पण काही लोकांमध्ये सोडिअमचं प्रमाण कमी झाल्यास ब्लड प्रेशर वाढतं. कमी सोडिअमच्या प्रमाणामुळे हार्ट रेट आणि हृदयावर दबावही वाढू शकतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, व्यक्तीने एका दिवसात 1.5 ग्रॅमपेक्षा कमी मिठाचं सेवन करू नये. असं केलं तर हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. तेच 50 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी आणि डायबिटीज रूग्णांनी दररोज 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये.
सोडिअम एक महत्वाचं पोषक तत्व आहे आणि अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, हृदय निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी दररोज 3 ते 6 ग्रॅम याचं सेवन करावं. जास्तीत जास्त लोक याच प्रमाणात सोडिअम घेतात.
साखरेचा हृदयावर होणारा परिणाम
पॅक्ड फूड्समध्ये 75 टक्के आर्टिफिशिअल शुगर असते. शुगरचं जास्त प्रमाण हार्मोन्सचं नुकसान करतं. ज्यामुळे केवळ डायबिटीजच नाही तर हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढू शकतो. जे लोक दररोज एडेड शुगरपेक्षा २५ टक्के जास्त किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरींचं सेवन करतात त्या लोकांमध्ये हार्ट अटॅकने जीव जाण्याचा धोका त्या लोकांमध्ये 3 पटीने जास्त असतो जे लोक एडेड शुगरपेक्षा 10 ट्क्के कमी कॅलरी घेतात.
साखरेच्या जास्त सेवनाने लठ्ठपणा, दातांशी संबंधित समस्या, ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची समस्या होऊ शकते. मात्र, अमेरिकन गाइडलाइन कमेटीने साखरेच्या तुलनेत मिठाला अधिक नुकसानकारक मानलं आहे. आणि फूड इंडस्ट्रीला सोडिअमचं प्रमाण कमी करण्यास सांगितलं आहे.