बाहेर आलेलं पोट कमी करण्यासाठी आल्यापासून बनवा 'हे' चार ड्रिंक्स, रोज प्या मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:51 PM2024-09-03T16:51:37+5:302024-09-03T16:52:06+5:30
Ginger Drinks For Weight Loss : आलं हे गरम असतं, त्यामुळे याचा वापर सर्दी-खोकला, डोकेदुखी दूर करण्यासाठी केला जातो. सोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते.
Ginger Drinks For Weight Loss : आलं एक असं फूड आहे ज्याचा वापर मसाला म्हणून जास्त केला जातो. त्यामुळे भारतातील प्रत्येक किचनमध्ये आलं असतंच. पदार्थांची टेस्ट वाढवण्यासोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. आयुर्वेदातही आल्याला फार महत्व आहे. अनेक आजारांच्या उपचारासाठी याचा वापर फार आधीपासून केला जातो. यात जिंजरोलसारखं तत्व असतं जे अनेक आजार दूर करण्यासाठी मदत करतं.
आलं हे गरम असतं, त्यामुळे याचा वापर सर्दी-खोकला, डोकेदुखी दूर करण्यासाठी केला जातो. सोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. आल्याने शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि फॅट कमी करण्यास मदत मिळते. अशात याने बाहेर निघालेलं तुमचं पोट कमी होण्यास मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला आल्यापासून तयार अशा चार ड्रिंक्सबाबत सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही बेली फॅट कमी करू शकता.
जिंजर टी
आल्याचा विषय निघताच लोकांच्या मनात सगळ्यात आधी आल्याचा चहा येतो. आल्याशिवाय चहाचा विचार करणं अनेकांसाठी अवघड असतो. पण चहामधील दूध आणि साखरेमुळे बेली फॅट वाढतं. त्यामुळे आल्याच्या काळ्या चहाचं सेवन करा. यासाठी पाण्यात चहा पावडर, आलं, लवंग, वेलची आणि काळी मिरी बारीक करून टाका. गूळ किंवा मध टाकून हे मिश्रण गाळून घ्या. याने पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल.
जिंजर लेमोनेड
हे खास ड्रिंक बनवण्यासाठी आल्याचा किस काढा आणि मधासोबत पाण्यात उकडून घ्या. हे पाणी थंड होऊ द्या. यात थोडा लिंबाचा रस टाका आणि थोडं थंड पाणी टाका. या ड्रिंकने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि मध हे एक चांगलं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
जिंजर टर्मरिक लाटे
हे ड्रिंक तयार करण्यासाठी दूध उकडून घ्या आणि त्यात आलं किसून टाका. नंतर त्यात चिमुटभर हळद टाका. हे गाळून घ्या आणि त्यात गूळ टाका. तुमचं हे खास ड्रिंक तयार आहे. या ड्रिंकने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं, जॉईंट्सच्या वेदना दूर होतात, इम्यूनिटी वाढते आणि पचनही सुधारतं.
सिनेमन जिंजर
हे ड्रिंक तयार करण्यासाठी पाण्यात दालचीनीचा एक तुकडा टाका आणि त्यात आलं किसून टाका. हे पाणी उकडल्यानंतर गॅस बंद करा आणि यात थोडा लिंबाचा रस टाका. याने भूक कमी लागते आणि चरबी कमी करण्यास मदत मिळते. तर दालचीनी एक चांगलं अॅंटी-इन्फ्लेमेटरी एजंट आहे. यातील लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी मुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.