सत्तरीतील चौदा गावे प्रभावित
By admin | Published: February 3, 2016 12:28 AM2016-02-03T00:28:55+5:302016-02-03T00:28:55+5:30
माकडतापाचा उद्रेक सुरूच; गावांमध्ये घबराट; काजू बागायतीवर परिणाम
Next
म कडतापाचा उद्रेक सुरूच; गावांमध्ये घबराट; काजू बागायतीवर परिणाम वाळपई : सत्तरीतील माकडताप हळूहळू तालुकाभर पसरताना दिसत असून आतापर्यंत 14 गावे प्रभावित झाली आहेत. त्या चौदाही गावांत मिळून 62 जणांना माकडतापाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी 32 जणांना माकडतापाची लागण झाली होती. त्या वेळी चार जणांचा बळी गेला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी माकडतापाने भयानक रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे येथे घबराट पसरली आहे. आतापर्यंत 62 जणांना माकडतापाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी 32 जणांना माकडताप झाला होता. त्यामुळे आतापर्यंत सत्तरी तालुक्यातील 94 जणांना माकडतापाची लागण झाली असून सहा जणांचा बळी गेला आहे. पाली गावात गेल्या वर्षी माकडतापाने चार जणांचा बळी गेला होता; पण त्याचे निदान होण्यास बराच उशीर झाला होता. यावर्षीही माकडतापामुळे दोघांचा बळी गेल्याने नागरिक सरकारविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत. वाळपई रुग्णालयात पुरेशी उपचार यंत्रणा नाही. त्यामुळे माकडतापाच्या रुग्णाचा वाळपई रुग्णालयात मृत्यू झाला. येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना गोमेकॉत पाठविण्यात येते. दोन दिवसांत लस पोहोचेल, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले होते; पण नऊ दिवस उलटले तरी अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. माकडतापाबद्दल आरोग्य खाते व सरकार गांभीर्याने विचार करीत नसल्याने सत्तरीत सरकारबद्दल असंतोष पसरला आहे. बॉक्स- लस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात : आरोग्य अधिकारी माकडतापाची लस फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी वाळपई आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुरेखा परुळेकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, फक्त पाचशे लसींची मागणी करण्यात आली आहे; कारण गेल्या वर्षी दोन हजार लसी आणल्या होत्या; पण फक्त पाचशे जणांनी लस टोचणी करून घेतली होती. दीड हजार लसी परत पाठविल्या होत्या. या वेळी पाचशे लसी मागविण्यात आल्या आहेत. माकडताप नियंत्रणात आणण्यास नागरिक सहकार्य करीत नसल्याचे डॉ. परुळेकर म्हणाल्या. बॉक्स- जागृती कार्यक्रम सुरूच; पण माकडतापावर नियंत्रण नाहीवाळपई आरोग्य केंद्रातर्फे माकडतापाविषयी जागृती कार्यक्रम सुरू आहे; पण माकडतापावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. माकडताप हा संसर्गजन्य रोग नाही. तो माणसापासून माणसाला होत नाही. मृत माकडाला कि?ी (किटक) चावली की ती कि?ी माणसाला चावते. ती फार वेळ तशीच अंगावर राहिली तरच त्या माणसाला माकडताप येतो; कारण माकडाचा मृत्यू तापामुळे झालेला असतो. मृत माकडापासून पन्नास मीटर अंतरापर्यंत त्याचे विषाणू पसरतात. जर त्या मृत माकडाला चावलेली कि?ी दुसर्या माकडाला चावली तर त्या माकडाचाही मृत्यू होतो. त्यामुळे माकडतापाचा प्रसार होत राहतो. बॉक्स- वाघेरी प?य़ात अनेक मृत माकडेवाघेरी प?य़ात अनेक माकडांचा मृत्यू झाला असून त्या मृत माकडांकडे कोणीही पोहोचत नाही. त्यामुळे माकडतापाचा प्रसार झपाट्याने सत्तरी तालुक्यात होत आहे. दोन दिवसांपूर्वी केरी येथे दोन माकडांचा मृत्यू झाला. म्हाऊस जंगलातही अनेक माकडांचा मृत्यू झाला आहे. बॉक्सकाजू बागायतीवर परिणाम काजूचा हंगाम जवळ आला आहे; पण माकडतापाच्या भीतीने काजू बागायतीत जाण्यासाठी लोक घाबरत आहेत. त्यामुळे काजू बागायतीवर ठोस परिणाम झाला आहे. काजू बागायतीपासून मिळणार्या उत्पन्नावर अनेकजण उदरनिर्वाह करतात; पण आज त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. ----‘म्हाऊस गावातील लोक गेले दीड महिना दडपणाखाली असून काजू बागायतीत जाण्यासाठी घाबरत आहेत. म्हाऊस गावात माकडतापाने दोघांचा बळी गेला आहे. सरकारने लवकरात लवकर माकडतापावर नियंत्रण आणावे.’ - सुनील म्हाऊसकर---बॉक्स- लसिकरणाबद्दल केवळ आश्वासनेचउपमुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत लस टोचणी केली जाईल, असे आश्वासन दिले होते; पण आज नऊ दिवस झाले तरीही लसीचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारचे फक्त आश्वासनच राहिले; पण प्रत्यक्षात मात्र काहीही झाले नाही. सरकारने ताबडतोब लस आणावी, अशी मागणी माकडतापाने मृत्यू झालेल्या जानकी गावकर यांचा पुतण्या नागेश गावकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, काजू हंगाम जवळ आला असून काजू बागायतीची साफसफाई करावी लागते; पण माकडतापाच्या भीतीने लोक काजू बागायतीत जात नाहीत. त्यामुळे काजू बागायतीवर मोठा परिणाम होणार आहे. माकडतापावर त्वरित उपाययोजना करा : रमेश जोशी (धावे-सत्तरी)माकडतापावर आरोग्य खाते गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. माकडतापाच्या बाबतीत वन खाते, आरोग्य व पशुसंवर्धन खाते या तिन्हीही खात्यांत समन्वयाचा अभाव दिसून येत असून तिघांनी समन्वय ठेवून कामे केली तर नियंत्रण येऊ शकते. सत्तरीच्या सर्व गावांत लस टोचणी झाली पाहिजे. त्यात पंचायतींना बरोबर घेऊन लस टोचणी मोहीम केली पाहिजे. ती आजपर्यंत झालेली नाही. काजू बागायतीवर मोठा परिणाम झाला आहे. लोक काजू बागायतीत जाण्यास घाबरत आहेत. ----‘सरकार माकडतापाविषयी हलगर्जीपणा करीत असल्याचे आतापर्यंतच्या उपचार पद्धतीवरून दिसून येत आहे. गावातील जवळील जंगलात अनेक मृत माकडे पडलेली असतात; पण अधिकार्यांना माहिती देऊनसुद्धा मृत माकडे उचलण्यासाठी तीन ते चार दिवस लावतात. - बाबी गावकर ---------बॉक्सनैसर्गिक आपत्ती जाहीर करा : सत्तरी पत्रकार संघ माकडतापामुळे गेल्या दीड महिन्यात म्हाऊस गावात दोघांचा बळी गेला आहे. तसेच 62 जणांना माकडतापाची लागण झाली असल्याने सत्तरी तालुक्यावर मोठे संकट कोसळले आहे. सत्तरी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करा, असे निवेदन सत्तरी पत्रकार संघाने वाळपई मामलेदारांना दिले. गेल्या वर्षी माकडतापाचे 32 रुग्ण आढळले होते तर चार जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी 62 रुग्ण सापडले असून दोघांचा बळी गेला आहे, असे असतानाही सरकार गांभीर्याने विचार करीत नाही. सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी सत्तरी पत्रकार संघाने केली. वाळपई रुग्णालयात पुरेशी आरोग्य यंत्रणा नाही. आरोग्य, वन व पशुसंवर्धन खात्यांच्या अधिकार्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. सत्तरी मामलेदारांनी या तिन्ही खात्यांचे अधिकारी, सरपंच, पंच, सामाजिक संस्था यांची समिती गठीत करावी आणि वाळपई मामलेदार कार्यालयात मदत कक्ष सुरू करावा, अशी मागणी सत्तरी पत्रकार संघाने केली. या वेळी सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस यांनी येत्या दोन दिवसांत उपजिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून आरोग्य संचालक तसेच आरोग्य खाते, पशुसंवर्धन खाते, वन खाते व सामाजिक संस्था यांची संयुक्त बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करताना सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, उपाध्यक्ष बी. डी. मोटे, सचिव आकीब शेख, उदय सावंत, अब्दुल खान, मिलिंद गाडगीळ, पद्माकर केळकर, दिनेश कर्पे आणि सपना सामंत आदी उपस्थित होते. फोटो : 1) वाळपईत माकडतापाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना. 2) गावात माकडतापामुळे वाहतूक रोडावली आहे. 3) म्हाऊस गावातील जंगलात अशी मृत माकडे सापडत आहेत.