'या' चुकांमुळे पोटात जमा होतात घातक विषारी तत्व, आतड्यांची सफाई करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 10:43 AM2024-11-08T10:43:14+5:302024-11-08T10:44:05+5:30
Healthy Tips: नैसर्गिकपणे आतड्यांची रचना अशी केली आहे की, आपण जे काही खातो ते दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे. ज्यांच्या शरीरात ही क्रिया व्यवस्थित होते ते निरोगी राहतात.
Healthy Tips: बरेच लोक जेवणासंबंधी अनेक चुका करतात. ज्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं, इतकंच नाही तर वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. यातील एक मोठी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. बऱ्याच लोकांनी ही समस्या असते. लोक तासंतास टॉयलेटमध्ये बसून राहतात तरीही त्यांचं पोट साफ होत नाही. पोट साफ न झाल्याने आरोग्यावर प्रभाव पडतो. जास्त काळ बद्धकोष्ठतेची समस्या राहिल्याने आतड्यांमध्ये विषारी पदार्थ आणि न पचलेलं अन्न चिकटून राहतं. ही स्थिती गंभीर होऊ शकते. नैसर्गिकपणे आतड्यांची रचना अशी केली आहे की, आपण जे काही खातो ते दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं पाहिजे. ज्यांच्या शरीरात ही क्रिया व्यवस्थित होते ते निरोगी राहतात. पण ज्यांचं पचन तंत्र योग्यपणे काम करत नाही, त्यांच्या आतड्यांमध्ये विषारी तत्व जमा होतात.
काही लोकांना पुन्हा पुन्हा खाण्याची सवय असते. या सवयीमुळेही आतड्यांमध्ये विषारी तत्व किंवा अपशिष्ट अन्न जमा होतं. एक्सपर्टनुसार, जर रोज पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर आतड्यांच्या सिस्टीमध्ये समस्या होते. पुन्हा पुन्हा खाण्याच्या सवयीमुळे डायजेशनवर दबाव पडतो. त्यामुळे जेवणामध्ये तीन तासांचा गॅप असणं गरजेचं असतं. अशात आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये जमा विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
आतड्या साफ करण्याच्या टिप्स
आठवड्यातून एक दिवस उपवास
आयुर्वेदात उपवासाला फार महत्व आहे. याने शरीरासोबतच मनालाही आराम मिळतो. आयुर्वेदानुसार, आठवड्यातून एकदा उपवास केल्याने आतड्यांची स्वच्छता होते आणि त्यात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात. याने पचनासाठीची अग्नि वाढते. उपवासादरम्यान पाणी, फळांचा ताजा ज्यूस, हर्बल टी यांच्या सेवनाने ही क्रिया आणखी प्रभावी होते.
महिन्यातून एकदा एरंडी तेल
आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा एरंडीच्या तेलाचं सेवन केलं पाहिजे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची अधिक समस्या असते, त्यांनी महिन्यातून एकदा थोड्या एरंडी तेलाचं सेवन केलं पाहिजे. याने ब्लोटिंग, अॅसिडिटीपासून आराम मिळतो. एरंडीच्या तेलाच्या सेवनाने आतड्यांची सफाई होते. हे लक्षात ठेवा की, या तेलाचं खूप जास्त प्रमाणात सेवन करू नये.
कडूलिंब
आयुर्वेदात कडूलिंबाही खूप महत्व आहे. कडूलिंबाच्या सेवनाने आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यात अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-वायरल आणि अॅंटी-फंगल गुण असतात जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. याने आतड्यांची सूज कमी होते. तसेच गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्याही दूर होतात. बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. कडूलिंबाची पाने तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा यांचा ज्यूस पिऊ शकता.
महिन्यातून एकदा आतड्यांची सफाई
डायजेशनसंबंधी समस्यांसाठी वाचण्यासाठी महिन्यातून एकदा आतड्यांची सफाई करणं गरजेचं आहे. त्यासाठी वर सांगण्यात आलेले उपाय तुम्ही नियमित फॉलो करू शकता. या उपायांच्या मदतीने तुम्ही आतड्यांमधील विषारी तत्व, चिकटून बसलेले पदार्थ बाहेर काढू शकता.