नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल दूर करेल भाजलेला लसूण, वाचा कसं कराल सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 02:16 PM2024-11-07T14:16:08+5:302024-11-07T14:16:52+5:30
Fried Garlic for Bad cholesterol : शरीरातील हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. यातीलच एक बेस्ट उपाय म्हणजे भाजलेला लसूण.
Fried Garlic for Bad cholesterol : आजकाल जास्तीत जास्त लोकांना शरीरात हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होत आहे. याची वेगवेगळी कारणे असून यातील महत्वाची कारणे म्हणजे चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल आणि शरीराची हालचाल न करणे ही सांगता येतील. अशात शरीरातील हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. यातीलच एक बेस्ट उपाय म्हणजे भाजलेला लसूण. भाजलेल्या लसणामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि इतर औषधी गुण कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करतात.
लसणातील पोषक तत्व
लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतरही पोषक तत्व असतात. यातील मुख्य तत्व एलिसिन असतं. जे अॅंटी-वायरल, अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल गुणांसाठी महत्वाचं असतं. त्याशिवाय लसणामध्ये व्हिटॅमिन सी, बी६, सिलेनियम, पोटॅशिअम, अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. याच्या नियमित सेवनाने तुम्ही शरीरातील वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलही कमी करू शकता. याने काय काय फायदे होतात तेच जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉल कमी करतो
भाजलेला लसूण हा कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतो. यातील एलिसिन नावाच्या तत्वामुळे कोलेस्ट्रॉल शरीरात उत्पादन कमी नियंत्रित होतं. याच्या नियमित सेवनाने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हलही कमी होते. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो.
रक्तप्रवाह सुरळीत होतो
भाजलेल्या लसणामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि सूज कमी करणारे गुण असतात. जे रक्तवाहिन्यांना साफ ठेवतात आणि ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा करतात. याच्या सेवनाने रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोकाही कमी असतो. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोल राहतं. रोज लसणाची एक कळी खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो.
हृदयाची सुरक्षा
आयुष्य जास्त जगण्यासाठी हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. ज्यात भाजलेला लसूण तुमची मदत करू शकतो. भाजलेला लसूण हृदयासाठी एका सुरक्षा कवचसारखा काम करतो. यातील पोषक तत्व धमण्यांना साफ ठेवतातत. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो.
पचन तंत्र मजबूत राहतं
भाजलेल्या लसणाने केवळ कोलेस्ट्रॉलच नियंत्रित होतं असं नाही तर शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासही याने मदत मिळते. सोबतच पचनक्रियाही सुधारते व पोटातील सूज कमी होते. याने अन्न पचन होण्यासही मदत मिळते. शरीरात अनावश्यक फॅट जमा होत नाही.
इम्यूनिटी वाढते
लसणामध्ये अनेक पोषक असतात, त्यामुळे याच्या सेवनाने इम्यूनिटी सुद्धा बूस्ट होते. लसणामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-वायरल गुण असतात. जे इम्यून सिस्टीमला मजबूत करतात. याने शरीराला आजार आणि इन्फेक्शनसोबत लढण्यास मदत मिळते. सर्दी-खोकला यांसारख्या समस्याही दूर होतात.
भाजलेला लसूण कसा खाल?
रोज सकाळी रिकाम्या पोटी भाजलेला लसूण खाऊन तुम्ही वाढलेली कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करू शकता. यासाठी तुम्ही रोज एक ते दोन भाजलेल्या लसणाच्या कळ्या खाऊ शकता. लसूण जास्त प्रमाणात खाऊ नये. एक ते दोन कळ्या भरपूर झाल्या. लसणाचं जास्त सेवन कराल तर गंभीर नुकसान होऊ शकतं.