पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलातील समोसा ठरू शकतो कॅन्सरचं कारण, जाणून घ्या उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 03:45 PM2022-07-11T15:45:39+5:302022-07-11T15:45:57+5:30

Samosa Fry in Oil: अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, एकाच तेलाचा वापर करून समोसे किंवा इतर पदार्थ तळले जातात. कढईत एकदा टाकलेल्या तेलात समोसे अनेकदा तळले जातात.

Fried samosa in the same oil can cause cancer | पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलातील समोसा ठरू शकतो कॅन्सरचं कारण, जाणून घ्या उपाय...

पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलातील समोसा ठरू शकतो कॅन्सरचं कारण, जाणून घ्या उपाय...

Next

Samosa Fry in Oil: गरमागरम समोसे आणि भजी पाहून कुणाच्याही जिभेला पाणी सुटेल. समोसा खायला तर फार टेस्टी असतो, पण याचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर नुकसानही भरपूर होतात. याच्या अधिक सेवनाने कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. घरी किंवा बाहेरून आणून समोसा खात असाल तर याकडे लक्ष द्या की, समोसा एकाच तेलातून तळलेला आहे की नाही. असं नसेल तर तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. 

कॅन्सर निर्माण करणारे तत्व

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, एकाच तेलाचा वापर करून समोसे किंवा इतर पदार्थ तळले जातात. कढईत एकदा टाकलेल्या तेलात समोसे अनेकदा तळले जातात. पदार्थ बनवताना जेव्हा एकाच तेलाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर त्यात फ्री रॅडिकल्स तयार होतात. जे आजाराचं कारण ठरू शकतात. पुन्हा पुन्हा तेल गरम केल्याने त्यातील पोषक तत्व आणि गंध नष्ट होतो. त्यात अॅंटी-ऑक्सिडेंटही वाचत नाही. ज्यामुळे त्यात कॅन्सर निर्माण करणारे तत्व तयार होतात.

ट्रान्स फॅटचा धोका

यथार्थ हॉस्पिटलच्या डॉक्टर दीपांकर वत्स यांनी सांगितलं की, तसे तर तळलेले पदार्थ नियमित खाणं टाळलं पाहिजे. पण एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले जाणारे पदार्थ खाणं विषारी पदार्थासारखे असतात. या तेलाने ट्रान्स फॅटचं प्रमाण वाढतं. ट्रान्स फॅट सर्वात खराब कोलेस्ट्रॉल मानलं जातं. ज्याने हृदयासंबंधी समस्या अधिक वाढतात.

धमण्यांमध्ये निर्माण होतो अडथळा

त्यासोबतच तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याचं तापमान आणि फॅट इतकं वाढतं की, धमण्यांमध्ये अडथळा निर्माण करतं आणि याने कोलेस्ट्रॉल वाढतं. या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने यातील तत्व पदार्थांना चिकटतात आणि आरोग्यासाठी ते नुकसानकारक ठरतात. ज्याने अॅसिडीटी, हृदयरोग, अल्जायमर इत्यादी आजार होण्याचा धोका वाढतो.

एकावेळी एकच तेल

एकावेळी एकाच तेलाचा वापर कला. तेलाचा रंग बदलला असेल तर ते वापरू नका. ऑलिव ऑइल डीप फ्रायसाठी वापरू नका. स्वस्त तेल लवकर गरम होतं, हे तेल आसेवर ठेवताच त्यात फेस येऊ लागतो. त्याचा वापर करू नका. हे अॅडल्ट्रेटेड ऑइन आहे. जे शरीरासाठी नुकसानकारक आहे.

Web Title: Fried samosa in the same oil can cause cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.