बडीशेपचं पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:14 AM2024-01-16T11:14:29+5:302024-01-16T11:16:03+5:30
बडीशेपचं पाणी नियमित प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही दूर होते.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, सामान्यपणे जेवण केल्यावर लोक बडीशेप खातात. कारण हे सगळ्यांना माहीत आहे की, याने तोंडाला चांगली चव येण्यासोबत अन्न पचन होण्यास मदतही मिळते. बडीशेपमध्ये एनीसोल नावाचं एंटीऑक्सीडेंट असतं ज्यामुळे पचनास मदत मिळते.
एक्सपर्ट सांगतात की, बडीशेपचं पाणी नियमित प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्याही दूर होते. कारण यात आढळणारे तत्व गॅस आणि अॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात.
यासोबतच बडीशेपचं इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याने वजन कमी करण्यास, तोंडाची दुर्गंधी घालवण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ इतरही फायदे.
डायजेशनमध्ये मदत
बडीशेपचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगलं होते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठीही बडीशेपचं पाणी फायदेशीर मानलं आहे. याने गॅस, अॅसिडिटीही दूर होते.
वजन कमी करण्यास मदत
बडीशेपचं पाणी वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानलं जातं. कारण यात कॅलरी कमी असतात. तसेच याने सतत खाण्याची क्रेविंगही कंट्रोल करता येते.
अॅंटीऑक्सीडेंट
बडीशेपमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. जे आपल्या कोशिकांचं रक्षण करतात. तसेच अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे तुमची त्वचा तरूण दिसते. यासोबतच याने अनेक आजारांपासूनही बचाव होतो.