योग्य वेळी फळाचे सेवन आरोग्यदायी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 01:56 PM2016-09-23T13:56:14+5:302016-09-23T19:26:14+5:30
फळ हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे.
Next
योग्य वेळ : योग्यवेळी फळाचे सेवन केले तर त्याचे पोषणतत्व हे शरीराला मिळतात. कच्च्या फळांमध्ये शुगर व फाइबर कंटेट अधिक असतात. अशा फळांचे सेवन केल्यामुळे शरीरासाठी ते उत्तम असते. पोटात काही नसताना फळाचे सेवन केले तर ते पचन होण्यासाठीही खूप कमी वेळ लागतो. व शरीराला फळातील सर्व पोषकतत्व मिळतात.
यावेळेलाही सेवन करता येतात : काही जणांना जेवण केल्यानंतर फळ सेवन करण्याची सवय असते. ज्यांचा हा वेळ परफेक्ट असेल तर त्यांनी जेवणानंतर २ ते ३ तासानंतर फळाचे सेवन करावे. जेवणानंतर लगेच फळ सेवन केल्याने पोट जड झाल्यासारखे वाटायला लागते. रात्रीला फळाचे सेवन करणे हे टाळावे. रात्री फळाचे सेवन म्हणजे हे खूपच अयोग्य आहे.