वर्क फ्रॉम होम करताना सेवन करा 'हे' सुपरफूड्स, रुजुता दिवेकर सांगातायत हा हेल्दी फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:11 PM2021-09-29T13:11:36+5:302021-09-29T16:26:46+5:30
तुम्हाला वर्क फ्रॉम होममुळे अनेक व्याधी आणि त्रासांना सामोरे जावे लागत असेल. पण याला पर्याय आहे. खुद्द रुजुता दिवेकर वर्क फ्रॉम होम करताना डाएटमध्ये अशा कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल हे सांगत आहेत. जाणून घेऊया या गोष्टी...
तुम्हाला वर्क फ्रॉम होममुळे अनेक व्याधी आणि त्रासांना सामोरे जावे लागत असेल. तुमच्या डोळ्यांवर, वजनावर, पचनशक्तीवर त्याचा विपरित परिणाम होत असेल. तुम्हाला वाटत असेल याला पर्याय नाही. पण याला पर्याय आहे. खुद्द रुजुता दिवेकर वर्क फ्रॉम होम करताना डाएटमध्ये अशा कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल हे सांगत आहेत. जाणून घेऊया या गोष्टी...
फळे
फळे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. जी मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. ताज्या आणि हंगामी फळांचा समावेश वर्क फ्रॉम होम करताना करा. या व्यतिरिक्त, आहारात प्रोबायोटिकचा समावेश करा ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. फळांमध्ये भरपूर फायबर असते. जे पाचन तंत्राला चालना देण्यासाठी मदत करते.
तूप
तूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे आपली त्वचा, सांधे आणि पचन सुधारण्यास मदत करते. हे फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. जे पचन सुधारते आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते.
नट्स
जास्त तास काम केल्यामुळे शरीरात ऊर्जा कमी होऊ लागते आणि हाडांची खनिज घनता देखील कमी होते. हाडे निरोगी ठेवण्यासाठी मूठभर सुकामेवा तसेच नट्स आपण दररोज खाल्ले पाहिजेत. हाडे कमकुवत झाल्यामुळे मासिक पाळी, डोकेदुखी, जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्या निर्माण होतात.