शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी 'या' फळांचं करा सेवन, लगेच दिसेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 01:16 PM2024-02-01T13:16:43+5:302024-02-01T13:17:46+5:30

Fruits For Cholesterol Patients : हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचं सेवन करू शकता ज्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

Fruits that can decrease bad cholesterol and increase good cholesterol naturally | शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी 'या' फळांचं करा सेवन, लगेच दिसेल फरक

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी 'या' फळांचं करा सेवन, लगेच दिसेल फरक

Fruits For Cholesterol Patients : शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की, अनेक समस्या होऊ लागतात. अशात हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचं सेवन करू शकता ज्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

कोलेस्ट्रॉल वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. ज्यात अनहेल्दी डाएट, प्रोसेस्ड फूड्स आणि बाहेरचे तळलेले पदार्थ, शुगर असलेले पदार्थ आणि लो फायबर फूड्स हे यांचा समावेश असतो. त्यासोबतच स्मोकिंग, अल्कोहोलचं जास्त सेवन, एक्सरसाइजची कमतरता, हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसमुळेही ही समस्या होऊ शकते. अशात हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही फळांचं सेवन फायदेशीर ठरतं. ज्यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतील.
कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय.

आंबट फळं

आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे नुकसानकारक LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, व्हिटॅमिन सी हार्ट डिजीज आणि ब्लड प्रेशरचा धोका कमी करतात. अशात ही फळं आवर्जून खावीत.

अ‍ॅवोकाडो

अ‍ॅवोकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हार्टसाठी फायदेशीर असतं. अ‍ॅवोकाडो हाय डेंसिटी असलेल्या लिपोप्रोटीन आणि लो डेंसिटी असलेल्या लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल दोन्हीची तुलना संतुलित करतं.

जांभळं

जांभळांमध्ये फायटोन्यूट्रिएट्स असतात जे तुमच्या हार्टसाठी फायदेशीर असतात. तसेच कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. जांभळाचा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश केला तर तुम्ही तुमच्या शरीरात हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करू शकता.

केळी

केळीमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स सोबतच सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लूकोजसारखं शुगर असतं. केळी पोटॅशिअम आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. ज्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते.

फायबर फूड

फायबर असलेले फूड्स किंवा फळं हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात. फळांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्याला मेडिकल भाषेत पेक्टिन म्हटलं जातं. याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. फायबर भरपूर असलेल्या सफरचंद आणि नाशपाती सारख्या फळांचं नियमितपणे सेवन करा.

Web Title: Fruits that can decrease bad cholesterol and increase good cholesterol naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.