नकली आहे तुम्ही पित असलेले हे ज्यूस, शरीरासाठी घातक 'या' ज्यूसचा FSSAI ने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 10:47 AM2024-06-05T10:47:49+5:302024-06-05T10:48:18+5:30
ICMR ने बॉटलमधील किंवा पॅकेटमधील ज्यूस न पिण्याचा सल्ला दिला होता. आता FSSAI ने पॅकेट आणि बॉटलमधील ज्यूस विरोधात कठोर पावलं उचलली आहेत.
वेगवेगळी फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे तुम्हाला माहीत आहे. सोबतच फळांचा रसही शरीराला अनेक पोषक तत्व देतो. मात्र FSSAI अशा ज्यूसवर कारवाई केली आहे जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. FSSAI ने अशा पॅकेट बंद ज्यूसचं पोलखोल केली आहे जे हेल्दी नसतात.
ICMR ने काही दिवसांआधीच सल्ला दिला होता की, उन्हाळ्यात पाणी, नारळाचं पाणी आणि फळांचा ज्यूस प्यावा. पण जास्तीत जास्त एक्सपर्ट ज्यूसऐवजी फळ खाण्याचाच सल्ला देतात. ICMR ने बॉटलमधील किंवा पॅकेटमधील ज्यूस न पिण्याचा सल्ला दिला होता. आता FSSAI ने पॅकेट आणि बॉटलमधील ज्यूस विरोधात कठोर पावलं उचलली आहेत.
FSSAI ने खाद्यपदार्थ व्यवसाय चालवणाऱ्यांना सांगितलं की, ते त्यांच्या ज्यूसच्या बॉटलवर किंवा लेबलवर 100 टक्के फ्रूट ज्यूस लिहू शकत नाही. हे दावे खोटे आणि फसवे असतात. बॉटलमधील किंवा पॅकेटमधील ज्यूसमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. तर फळांचे पोषक तत्व कमी असतात.
खराब असू शकतो ज्यूस
पॅकेट आणि बॉटलमध्ये मिळणारा ज्यूस अनेक महिने जुना असू शकतो. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात ज्यूस बॉटलमध्ये अळ्या किंवा कीटक सापडले आहेत. या ज्यूसमुळे आरोग्य बिघडू शकतं.
डायबिटीसमध्ये घातक
पॅकेटमधील ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं. यात शुगरला वेगवेगळी नावे दिलेली असतात. असे ज्यूस डायबिटीसच्या रूग्णांसाठी फार घातक ठरू शकतात. ज्यांना डायबिटीस नाही त्यांना डायबिटीसचा धोकाही वाढतो. तसेच यात वेगवेगळे नुकसानकारक केमिकल्सही टाकले जातात.
ताज्या फळांचा ज्यूस जास्त फायदेशीर
पॅकेटमधील ज्यूसचं सेवन करण्याऐवजी तुम्ही ताज्या फळांचा ज्यूस प्यावा. तरीही जास्तीत जास्त एक्सपर्ट ताजी फळं खाण्याचाच सल्ला देतात. यात फायबर असतं. तसेच यातील पोषक तत्व शरीराला जास्त फायदा देतात.