केवळ किडनीच नाहीतर पित्ताशयातही होतात स्टोन, जाणून घ्या लक्षणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:40 PM2024-02-21T12:40:33+5:302024-02-21T12:43:38+5:30
Gallbladder stone : केवळ किडनीच नाही तर पित्ताशयातही स्टोन तयार होतात. ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. जाणून घ्या लक्षणे...
Gallbladder stone : सगळ्यांनाच किडनी स्टोनबाबत माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पित्ताशयातही स्टोन होतात. त्याहून गंभीर बाब म्हणजे यावर कोणताही घरगुती उपाय किंवा औषध नाही. जास्तीत जास्त केसेसमध्ये यावर उपाय म्हणून सर्जरीच्या वेळ येते. या वेदनादायी समस्येपासून वाचवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
पित्ताच्या स्टोनवर उपाय
गॉलब्लॅडरमध्ये लिव्हरमधून निघणारे बाइल ज्यूस म्हणजे पाचन रस असतात आणि नंतर ते छोट्या आतड्यांमध्ये जातात ज्यामुळे अन्न पचतं. याला पित्ताची पिशवीही म्हटलं जातं. अनेकदा या पिवशीमध्ये स्टोन तयार होतात, ज्याला पित्ताशयाचे स्टोन म्हटलं जातं. जास्तीत जास्त केसेसमध्ये हे ऑपरेशन करूनच काढले जातात.
का तयार होतात हे स्टोन?
मुळात लिव्हरमधून येणार बाइल ज्यूस म्हणजे पाचन रस स्टोन होण्याचं कारण बनतो. अनेकदा बाइल ज्यूस जड असतो आणि स्टोनचं रूप घेऊन तिथेच जमा होतो.
पित्ताशयातील स्टोनचा आकार वाळूच्या कणांसारखा छोटा ते गोल्फ बॉल इतका असू शकतो. काही लोकांमध्ये एक तर काही लोकांमध्ये अनेक स्टोन विकसित होतात.
या लक्षणांकडे द्या लक्ष
पोटाच्या वर डाव्या बाजूला अचानक जोरात वेदना, पोटाच्या मधे किंवा छातीच्या हाडांखाली वेदना होत असेल, पाठीत वेदना होत असेल, डाव्या खांद्यात वेदना होत असेल आणि मळमळ किंवा उलटी होत असेल तर लगेच सावध व्हा.
पोटात गंभीर वेदना होत असेल ज्यामुळे बसणं किंवा उठणं अवघड झालं अशेल, त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडला असेल, थंडी वाजून ताप येत असेल तर लगेच डॉक्टरांकडे जावं.
स्टोन तयार का होतात?
कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने, bilirubin लेव्हल वाढल्याने किंवा पित्तात जास्त बाइल ज्यूस न निघाल्याने स्टोनची समस्या होते.
कसा कराल उपाय
जेवण करणं टाळू नका, वजन कमी करा, हाय फायबर असलेले फूड्स खावेत. ही सगळी कामे केल्याने तुमच्या पित्ताच्या पिशवीत स्टोन होणार नाहीत.