ग्रीन पार्क परिसरात दत्तक झाड योजनेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:45 PM2017-07-29T13:45:25+5:302017-07-29T13:46:26+5:30
कोल्हापूर, दि.२९ : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन उद्योजक संग्राम पाटील यांनी केली.

‘ग्रीन पार्क’ परिसरातील रहिवाशांनी आपल्या परिसरात वृक्षारोपणासाठी कंबर कसली आहे. वृक्षलागवडीसह संगोपणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन परिसरात ‘दत्तक झाड योजना’ राबविली जात आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसवेक लाला भोसले होते. बी.डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगससेवक भोसले म्हणाले, वृक्षारोपण ही गरज व त्याचे महत्व जवळपास प्रत्येकाला समजून चुकले आहे. भरपूर वृक्ष लावलेल्या बागेत नियमित फिरल्याने,व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तणावामुळे शरीरावर होणाºया नकारात्मक परिणामांचा प्रभावही कमी होतो. झाडे जितकी जास्त असतील तितक्या प्रमाणात श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या घटेल, असे संशोधनकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे फक्त वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
पुरात्वत विभागाचे माजी संचालक अर्जुन देसाई म्हणाले, दत्तक झाड योजने अंतर्गत प्रत्येकाने झाडांना आपल्या नातेवाईकांचे नाव दिल्याने त्या झाडाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक आपुलकी निर्माण होईल. पर्यावरण संवर्धनाची फक्त एकट्याचे काम नसून त्यासाठी सर्वांनीच हातभार लावल्यास नक्कीच ‘ग्रीन पार्क’ हे नाव सार्थकी ठरेल.
यावेळी श्रीकांत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर एस. एस. मुल्ला यांनी आभार मानले. याप्रसंगी मुरलीधर आळतेकर, चव्हाण, चंद्रकांत पाटील, डॉ. रणजीत नरके, पी.एल.मुंडे, डॉ. उदयसिंग देसाई, युवराज भोसले, गंधार लोंढे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रत्येक झाडाला नाव....
ग्रीन पार्क परिसरात नागरिकांच्या माध्यमातून हा प्रकल्प या परिसरात राबविला जाणार आहे. केवळ झाडे लावून काम संपणार नाही तर ते झाड येथील रहिवाशी दत्तक देऊन त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत. तसेच त्यांच्या इच्छेनुसार दत्तक झाडाला स्वत:चे किंवा परिवारातील कोणाचेही नाव दिले जाणार आहे.