High Cholesterol कमी करायचं असेल तर खा हे फूड, Blood Pressure सुद्धा होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 01:07 PM2022-10-14T13:07:41+5:302022-10-14T13:08:32+5:30
How To Control High Cholesterol Level: तुम्ही जर ही समस्या टाळायची असेल एक भाजीचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही.
How To Control High Cholesterol Level: भारतात लोक तेलकट पदार्थ जास्त खातात. हेच कारण आहे की, त्यांच्या शरीरात हळूहळू बॅड कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागतं. ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची समस्या होते. अशात तुम्ही जर ही समस्या टाळायची असेल एक भाजीचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतोय लसणाबाबत. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे...
वाढतं कोलेस्ट्रॉल होईल कमी
लसणात टामिन्स, मिनरल्स, अमीनो अॅसिड आणि ऑर्गनोसल्फर तत्व असतात. जसे की, एलिसिन, एजोइन, एस-एथिलिसीस्टीन आणि डायलिलसफ्लाइड आढळतात. सोबतच यात असलेल्या सल्फर तत्वात हर्बल तत्व असतात. हेच कारण आहे की, हे खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. जर तुम्ही रोज कच्चा लसूण खाल्ला तर याने ब्लड प्रेशरही कमी होतं.
कसं करावं लसणाचं सेवन
- जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रणाम वाढलं असेल तर लसूण आणि लिंबू मिक्स करून प्यायलं जाऊ शकतं. असं केल्याने लिपिड लेव्हल चांगली होते आणि सोबतच ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते.
- रोज सकाळी उठून लसणाच्या काही कळ्या कच्च्या चावून खाव्या. असं केल्याने काही दिवसात तुम्हाल फरक दिसून येईल. जर तुम्ही नंतर टेस्ट केली तर कोलेस्ट्रॉलचं प्रणाम कमी झालेलं दिसेल.
- जर तुम्हाला माहीत असेल तर लसणाचा गंध फार गर्द असतो. याचं लसणामध्ये एलीसिन भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरासाठी फार हेल्दी असतं.
- याची काळजी घ्यावी लसूण गरम असतो. त्यामुळे त्याचं सेवन जास्त प्रमाणात करू नये. जास्त सेवन कराल तर त्याचे नुकसानही खूप असतात.