या 4 समस्या असतील तर चुकूनही खाऊ नका लसूण, आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिला खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:14 AM2023-02-23T11:14:17+5:302023-02-23T11:14:51+5:30
Harmful Effects Of Garlic : कमजोर इम्यूनिटी असलेल्या लोकांना याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जास्तीत जास्त लोकांना लसणाचा फायदाच होतो. पण काही आजारांनी पीडित असलेल्या लोकांनी लसणापासून दूरच राहिलं पाहिजे.
Harmful Effects Of Garlic : लसणाचा तकडा पदार्थाची टेस्ट दुप्पट करतो. नेहमीच वेगवेगळ्या भाज्यांपासून ते फास्ट फूडमध्ये लसणाचा भरपूर वापर केला जातो. लसणाचे पदार्थ लोक चवीने खातात. आयुर्वेदात लसणाला आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं आहे. याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कमजोर इम्यूनिटी असलेल्या लोकांना याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जास्तीत जास्त लोकांना लसणाचा फायदाच होतो. पण काही आजारांनी पीडित असलेल्या लोकांनी लसणापासून दूरच राहिलं पाहिजे.
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की, लसणामध्ये अनेक औषधी गुण असतात. जे आरोग्याला मोठे फायदे देतात. हिवाळ्यात लसूण फारच फायदेशीर ठरतो. याचं सेवन उन्हाळ्यातही करता येतं. मात्र, उन्हाळ्यात प्रमाण कमी असावं. पण हाय ब्लड प्रेशर, गॅस आणि पोटात जळजळसहीत इतर काही समस्या असलेल्या लोकांनी लसूण खाऊ नये. असं केल्याने त्यांची समस्या वाढू शकते आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. अशात लसणाचं सेवन काळजीपूर्वक करावं. आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशात लसणाचा वापर कमी केला पाहिजे.
आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, हाय ब्लड प्रेशर, अॅसिडिटी, गॅस, पोटात जळजळ आणि लूज मोशन असलेल्या लोकांनी लसणाचं सेवन करू नये. असं केल्याने ब्लड प्रेशर वेगाने वाढू शकतं. जे अनेकदा हार्ट अटॅकचं कारण बनतं.
त्याशिवाय गॅस, अॅसिडिटी आणि पोटात जळजळीची समस्या लसणाच्या सेवनाने वाढू शकते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रूग्णांसाठी लसूण नुकसानकारक मानला जातो. या समस्या असूनही तुम्ही लसूण खात असाल तर त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. जेणेकरून साइड इफेक्ट तुमची समस्या वाढवणार नाही.