स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठेवतो कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात, 'या' गंभीर आजारांवर आहे रामबाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 02:54 PM2022-04-25T14:54:02+5:302022-04-25T14:57:28+5:30
लसूण कोणत्याही भाजीची चव तर वाढवतोच, पण तो औषधाप्रमाणे कामही करतो. लसूण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यासाठी लसणाचा वापर कसा करावा ते (Cholesterol Control By Garlic) जाणून घेऊया.
आपल्या स्वयंपाकघरात अनेक मसाले असतात. अगदी हळद, मिरे, जिरे, ओवा असे अनेक पदार्थ आपल्या किचनमधल्या मिसळण्याच्या डब्यात असतात. हे सगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. आयुर्वेदाने (Ayurveda) त्यांचे गुणधर्म सांगून ठेवले आहेत, त्यामुळे आपल्या भारतातील अन्नपदार्थांमध्ये मसाले वापरले जातात आणि ते आपोआप आपलं आरोग्य चांगलं राखतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही लसूण फायदेशीर आहे. किचनमध्ये वापरला जाणारा लसूण खूप उपयुक्त आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. लसूण कोणत्याही भाजीची चव तर वाढवतोच, पण तो औषधाप्रमाणे कामही करतो. लसूण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यासाठी लसणाचा वापर कसा करावा ते (Cholesterol Control By Garlic) जाणून घेऊया.
लसणामुळे कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रणात राहते -
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, लसणात अॅलिसिन आणि मॅग्नोलिया सारखे गुणधर्म असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. यासोबतच यात अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
लसूण कसा वापरावा -
- दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाची एक पाकळी घेतल्याने कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवता येते.
- याशिवाय लसूण मधात मिसळून खाऊ शकता. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते, तसेच हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेली चरबीही निघून जाते. या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहील.
- कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी जवसाच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत. जवसाच्या बिया कोलेस्ट्रॉलवर गुणकारी ठरतात.
- नाश्त्यामध्ये ओट्स समावेश करा. याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
- कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी धणे देखील फायदेशीर आहेत, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मासे महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही मासे खात नसाल तर त्याऐवजी डाळींचा आहारात समावेश करू शकता.