हाय ब्लड प्रेशरमध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, अनेकांना माहीत नाही याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 12:42 PM2022-11-12T12:42:55+5:302022-11-12T12:45:21+5:30

Garlic For High Blood Pressure : हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, लसूण शरीरात गुड कोलेस्‍ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. त्याशिवाय लसणाचे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

Garlic is considered very beneficial in high blood pressure | हाय ब्लड प्रेशरमध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, अनेकांना माहीत नाही याचे फायदे

हाय ब्लड प्रेशरमध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, अनेकांना माहीत नाही याचे फायदे

googlenewsNext

Garlic For High Blood Pressure:  भारतातील जास्तीत जास्त किचनमध्ये लसणाचा वापर केला जातो. याच्या वापराने पदार्थांची टेस्ट वाढते. अनेकांना हेही माहीत असेल की, आजही अनेक गंभीर आजारांवर औषध म्हणून लसणाचा वापर केला जातो. लसणामध्ये एलीसीन नावाचं एक तत्व आढळून येतं. जे शरीरातील बॅड कोलेस्‍ट्रॉलला दूर करतं. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, लसूण शरीरात गुड कोलेस्‍ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. त्याशिवाय लसणाचे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.

लसणाचे आरोग्यदायी फायदे

- सध्याच्या लाइफस्टाईलमुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. लोकांना लठ्ठपणा, डायबिटीस आणि हाई ब्लड प्रेशरसारखे आजार होत आहेत. हाय ब्लड प्रेशरची समस्या दूर करण्यासाठी लसूण फार फायदेशीर ठरतो. यासाठी सकाळी उठून कच्च्या लसणाची एक कळी चावून खावी. याने हाई ब्लड प्रेशरचा धोका कमी राहतो.

- सध्या सगळीकडे थंडीची लाट आहे. अशात यादरम्यान इम्यूनिटी फार कमजोर होत असते. तुम्हाला माहीत नसेल की, लसणामधील अॅंटी-ऑक्सिडेंट शरीराची इम्यूनिटी वाढवण्याचं काम करतं. याने हृदय निरोगी राहतं आणि अनेक आजारांचा धोका कमी केला जातो. यात आढळणारे अॅंटी-इफ्लेमेटरी तत्व अनेक इन्फेक्शनपासून वाचवतात.

- बॅड फूड हॅबिट्स आणि शरीरात वाढत्या लठ्ठपणामुळे बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू लागते. जर वेळीच याला कंट्रोल केलं नाही तर हा जीवघेणाही ठरू शकतो. या दरम्यान नसांमध्ये ब्लॉकेजची समस्या बघायला मिळते. लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतो. तसेच याने मेटाबॉलिज्म रेटही चांगला होऊन डायजेशन चांगलं होतं.

Web Title: Garlic is considered very beneficial in high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.