Garlic Peel: कचरा समजून फेकू नका लसणाची साल, फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:43 AM2022-09-13T11:43:14+5:302022-09-13T11:43:25+5:30
Garlic peel health benefits : लसणाचे साल बारीक करून किंवा पाण्यात उकळून वापरावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूट्रिएंट्स कमी होतात.
Garlic peel health benefits : लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच त्याच्या सालींमध्येही अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. यामध्ये एलिसिन कंपाउंड असतात. जे आरोग्याला खूपच उपयोगी आहे. लसणाचे साल बारीक करून त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात. लसणाचे साल बारीक करून किंवा पाण्यात उकळून वापरावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूट्रिएंट्स कमी होतात. यामुळे ताज्या लसणाच्या सालींचा वापर फायदेशीर आहे.
लसणाच्या सालीचे कोणते उपयोग आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून घ्यावे. हे पाणी कोमट करून केस धुतल्याने केसगळतीची समस्या दूर होते. लसणाचे साल बारीक करून मुरुमावर लावावे. यामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम ठीक करण्यात मदत करते.
तसेच लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून गाळून प्यायल्याने सर्दी-पडशापासून आराम मिळतो. लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून हे पाणी कोमट करून त्यामध्ये पाय ठेवल्याने पायांची सूज दूर होते. लसणाच्या पाकळ्या बारीक करून यामध्ये मध मिसळून ते सकाळ-संध्याकाळ घेतल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.
लसणाच्या सालींची पेस्ट बनवून त्यामध्ये लिंबूचा रस मिसळून केसांच्या मुळांवर लावल्याने उवा दूर होतात. लसणाच्या साली एका पॅनमध्ये गरम करून पावडर बनवावी. यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून केसांवर लावल्याने केसांचा रंग काळा होतो. लसणाच्या साल पाण्यात टाकून उकळून घेवून हे पाणी गार करून रोपांना टाकल्याने रोप लवकर वाढते. लसणाचे साल बारीक करून त्वचेवर लावल्याने दाद, खाजपासून आराम मिळतो.
कांद्याची सालही फायदेशीर
कांदा आणि लसणाची साल न फेकता त्यांचा वापर खत म्हणून केला जाऊ शकतो. यांपासून तयार केलेलं खत झाडांसाठी चांगलं मानलं जातं. कांदा आणि लसणाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम तसेच कॉपर असतं.
केसांसाठी फायदेशीर
कांद्याच्या सालीने केस चमकदार होतात. कांद्याची साल पाण्यात उकडून हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. याने केस चमकदार होतात. तेच यांचा वापर डोक्याचे केस रंगवण्यासाठीही केला जातो. कांद्याची साल 1 तास पाण्यात उकडून घ्या. या पाण्याने डोक्याची हलकी मालिश करा. नंतर अर्ध्या तासाने केस धुवा. हे केसांवर नैसर्गिक डायप्रमाणे काम करतं.
क्रॅम्पची समस्या होते दूर
अनेकदा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये क्रॅम्प येतो. याने लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशात कांद्याची साल पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. रात्री झोपण्याआधी हे पाणी प्या. याने मसल्स क्रॅम्पची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
त्वचेवरील खाज होईल दूर
अनेकदा काही लोकांच्या त्वचेवर खूप खाज येते. यासाठी ते अनेक प्रकारच्या औषधांचा वापरही करतात. पण घरीच कांदे आणि लसणाच्या सालीने ही समस्या लगेच दूर केली जाऊ शकते. पाण्यात भिजवून ठेवलेली कांद्याची आणि लसणाची साल शरीरावर खाज आहे तिथे लावा. याने बराच आराम मिळेल.