शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल लगेच बाहेर काढेल ही खास चटणी, जाणून घ्या कशी बनवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:26 AM2024-06-06T10:26:15+5:302024-06-06T10:26:35+5:30
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये मेणासारखा एक पदार्थ जमा होतो आणि रक्त पुरवठा खंडित होतो.
Red Chilli Garlic Chutney Recipe: कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. कमी वयातही लोकांना शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होत आहे. कोलेस्ट्रॉल वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये मेणासारखा एक पदार्थ जमा होतो आणि रक्त पुरवठा खंडित होतो. ब्लड सर्कुलेशन कमी झाल्याने सगळ्यात जास्त धोका हार्ट अटॅकचा असतो.
बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षण
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर याची वेगवेगळी लक्षण शरीरावर सहजपणे दिसून येतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर व्यक्तीला नेहमीच थकवा जाणवतो. हृदयावर दबाव राहत असल्याने श्वास घेण्यास समस्या होते.
हा उपाय करा
शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. पण लोक काही घरगुती आणि सोपे उपाय शोधत असतात. असाच हा एक सोपा उपाय आहे. घरीच एक लाल चटणी तयार करा. ही लाल चटणी खाऊन तुम्ही वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. या चटणीची खास बाब म्हणजे ही चटणी रक्त घट्ट होण्यापासूनही रोखते सोबतच ब्लड सर्कुलेशन योग्य ठेवण्यास मदत करते.
कशी बनवाल चटणी
लसणाच्या दोन कळ्या
गूळ
काही लाल मिरच्या
काळं मीठ
ही चटणी बनवण्यासाठी गूळ आणि लसणाच्या कळ्या चांगल्या बारीक करून घ्या. आता त्यात काही लाल मिरची टाका आणि काळं मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा. तुमची लाल चटणी तयार आहे.
- या चटणीच्या सेवनाने नसा आंकुचन पावत नाही आणि त्यांचं कार्य योग्यपणे चालतं.
- लसणामुळे रक्त पातळ राहतं.
- नसांमध्ये जमा बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर पडतं.
काय काळजी घ्याल
जे लोक वेगवेगळ्या आजारांवर काही औषधं घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या चटणीचं सेवन करू नये. असं केलं तर तुमच्या समस्या वाढू शकतात.