Garlic Side Effects : 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये लसूण, वाढू शकते समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:52 AM2022-06-23T10:52:12+5:302022-06-23T10:52:37+5:30
Garlic Side Effects: अनेक रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, यात अनेक आजार दूर करण्याची क्षमता आहे. तसेच याला आयुर्वेदिक उपचारातही फायदेशीर मानलं गेलं आहे. बरेच फायदे असण्यासोबतच याचे काही नुकसानही आहे.
Garlic Side Effects: जसं की आपणा सर्वांना माहीत आहे भारतीय किचनला आयुर्वेदिक औषधीच्या घराच्या रूपात पाहिलं जातं. कारण कोणत्याही प्रकारच्या आजारांसाठी किचनमध्ये अर्धी औषधं सापडतात. यातीलच एक म्हणजे लसूण. जो फारच पॉवरफुल मानला जातो. लसूण एक पॉवरफुल अॅंटी-ऑक्सीडेंट म्हणून प्रसिद्ध आहे.
अनेक रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, यात अनेक आजार दूर करण्याची क्षमता आहे. तसेच याला आयुर्वेदिक उपचारातही फायदेशीर मानलं गेलं आहे. बरेच फायदे असण्यासोबतच याचे काही नुकसानही आहे. तेही काही लोकांसाठी. काही आजार असे असतात ज्यात लसणाचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. ते कोणते आजार आहेत हे जाणून घेऊ...
डायबिटीस रूग्ण
डायबिटीस रूग्णांसाठी लसणाचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. याने त्यांना समस्या होऊ शकते. कारण जास्त प्रणामात लसणाचं सेवन केलं तर त्यांची ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते. ज्यामुळे त्यांना समस्या होऊ शकते. जर त्यांनी लसणाचं सेवन कमी प्रमाणात केलं तर याने शुगर कंट्रोल करता येते. पण जर प्रमाण जास्त झालं तर याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं.
लिव्हरची समस्या असणारे रूग्ण
ज्या लोकांना लिव्हर, आतड्या किंवा पोटाची समस्या आहे त्यांनीही लसणाचं सेवन करू नये आणि जर ते असं करत असतील तर त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. कारण आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे घाव असू शकतात. सोबतच लिव्हर ठीक करण्यासाठी देण्यात आलेल्या औषधांमुळे लसणात आढळणारे काही तत्व रिअॅक्ट होऊ शकतात ज्यामुळे समस्या वाढू शकते.
नुकतीच सर्जरी झालेले लोक
ज्या लोकांची सर्जरी नुकतीच झाली आहे त्यांनीही लसणाचं सेवन करणं टाळलं पाहिजे. तुम्हाला माहीत असेल की, लसूण रक्त पातळ करण्याचं काम करतं, अशात ज्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे त्यांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. कारण घाव ताजा असल्याने आणि रक्त पातळ झाल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.