लसणाचा चहा आरोग्यासाठी कसा ठरतो फायदेशीर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:45 AM2019-11-13T10:45:41+5:302019-11-13T10:52:59+5:30
हिवाळ्यात कफ, सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या अधिक होतात. तसेच इतरही अनेक आजार होण्याचा धोका या महिन्यात राहतो.
(Image Credit : organicfacts.net)
हिवाळ्यात कफ, सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या अधिक होतात. तसेच इतरही अनेक आजार होण्याचा धोका या महिन्यात राहतो. या दिवसात होणाऱ्या या समस्यांपासून बचाव करण्यासाठी लसूण, आलं आणि काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कफ आणि सर्दी दूर करण्यासाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो.
लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत अनेकांना माहीत असेलच. लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पावरफुल टॉनिक मानलं जातं. ज्याने कफ आणि सर्दी-पळसा दूर करण्यास मदत मिळते.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर असतो. आणि याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. तसेच याचा फायदा वजन कमी करण्यासही केला जातो. असे मानले जाते की, याने मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया मजबूत राहण्यासही मदत होते. एका रिसर्चनुसार, लसूण व्हजायनल इन्फेक्शन, माउथ अल्सर आणि पोटाच्या कॅन्सरवरही चांगला मानला जातो.
लसणाचा चहा करण्याची पद्धत
३ ते ४ लसणाच्या कळ्या दोन कप उकडत्या पाण्यात टाका. त्यात लिंबू आणि मध टाकून ५ मिनिटे उकडू द्या. तुमचा चहा तयार आहे. हा चहा तुम्ही सेवन करा.
(टिप : लसूण हा सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल हे गरजेचं नाही. त्यामुळे हा चहा घेताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्याव.)