शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय, एकदा करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:22 AM2024-08-29T10:22:41+5:302024-08-29T10:34:06+5:30

Garlic Water For High Cholesterol: पाण्यात काही खास गोष्टी मिक्स करून सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. लसूण अनेक दृष्टीने फार फायदेशीर ठरतो. लसणाच्या नियमित सेवनाने ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत मिळते. 

Garlic Water : Home remedies to reduce high cholesterol | शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय, एकदा करून बघाच!

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय, एकदा करून बघाच!

Garlic Water For High Cholesterol: आजकालच्या लाइफस्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक यासाठी औषधं घेतात, पण काही नैसर्गिक उपाय असे असतात ज्यांमुळे ही समस्या लगेच दूर होते. पाण्यात काही खास गोष्टी मिक्स करून सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. लसूण अनेक दृष्टीने फार फायदेशीर ठरतो. लसणाच्या नियमित सेवनाने ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत मिळते. 

लसणाचे फायदे

लसूण एक नॅचरल औषध आहे ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. याने वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. लसणांमध्ये अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. 

पाण्यात लसूण मिक्स करून पिण्याचे फायदे

१) कोलेस्ट्रॉल होईल कमी

लसणाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळेल. लसणामधील एलिसन नावाच्या तत्वाने रक्तामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं.

२) नसा होतील मोकळ्या

लसणामध्ये असे तत्व असतात जे रक्तप्रवाह वाढवततात आणि नसांमध्ये जमा झालेली चरबी दूर करतात. याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं आणि हृदयरोगांचा धोका कमी होतो.

३) डिटॉक्सिफिकेशन

लसणाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. लसूण पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीर आतून साफ होतं. तसेच शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

४) ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं

लसणांमध्ये असे अनेक तत्व असतात जे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यास मदत करतात. लसूण हायपरटेंशनच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर ठरतो.

कसं कराल याचं सेवन?

- सगळ्यात आधी एक ग्लास कोमट पाण्यात १ ते २ कळ्या लसूण बारीक तुकडे करून टाका.

- हे चांगलं मिक्स करा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.

- याच्या नियमित सेवनाने शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल कमी होईल.
 

Web Title: Garlic Water : Home remedies to reduce high cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.