चरबी जाळून पोट कमी करण्यास मदत करतो लसूण, जाणून घ्या खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 09:50 AM2023-06-24T09:50:58+5:302023-06-24T09:52:31+5:30

Garlic for Weight Loss : चरबी जाळण्यासोबतच लसणाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला अनेक आजारांसाठी उपाय मानलं आहे. तसेच लसणाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

Garlic will helpful to reduce belly fat and weight loss, know how | चरबी जाळून पोट कमी करण्यास मदत करतो लसूण, जाणून घ्या खास उपाय!

चरबी जाळून पोट कमी करण्यास मदत करतो लसूण, जाणून घ्या खास उपाय!

googlenewsNext

Garlic for Weight Loss : जर तुम्ही कधी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की, पोटावरील चरबी कमी करणं सगळ्यात अवघड काम असतं. बेली फॅट कमी करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. एक्सरसाइजसोबत खाण्या-पिण्यावरही लक्ष द्यावं लागतं. तुम्ही असे पदार्थ खाल्ले पाहिजे ज्याने फॅट बर्न होण्यास मिळेल. यासाठी बेस्ट उपाय म्हणजे लसूण.

चरबी जाळण्यासोबतच लसणाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला अनेक आजारांसाठी उपाय मानलं आहे. तसेच लसणाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. हाय बीपीची समस्या दूर होते आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनही होत नाही. 

पोट कमी करण्यासाठी काय करावं?

लसणाच्या 2 ते 3 कळ्या घ्या.

लसणाची साल काढा.

सकाळी या कळ्या कोमट किंवा नॉर्मल पाण्यासोबत चावून खाव्या.

यानंतर 1 तास दुसरं काहीच खाऊ नये.

टॉक्सिन बाहेर येईल

पोट निघण्याचं एक मोठं कारण म्हणजे शरीरात टॉक्सिन जमा होणं हे आहे. लसूण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी बेस्ट मानला जातो. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. ज्यामुळे शरीरात चरबी वाढणं थांबतं.

चरबी जाळतो लसूण

वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, लसूण शरीरात जमा फॅट कमी करण्यास मदत करतो. लसणामध्ये फॅट बर्निंग गुण असतात. जे शरीरातील जास्तीच्या चरबीला एनर्जी बनवून नष्ट करतात. यामुळे वजन लवकर कमी होतं.

भूक कमी लागते

भूकेपेक्षा जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्यासाठी भूकेला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. लसूण कॅलरी इनटेक कमी करण्यास मदत करतं. लसूण खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी आधी शरीरातील टॉक्सिन काढावं लागतं, फॅट बर्निंग वाढवावी लागते, मेटॉबॉल्जिम सुधारावं लागतं आणि भूक कंट्रोलमध्ये ठेवावी लागते. लसूण ही सगळी कामे करून वजन कमी करण्यास मदत करतं.

Web Title: Garlic will helpful to reduce belly fat and weight loss, know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.