गॅस, अपचन, पोट फुगतंय? किचनमधले 'हे' १३ पदार्थ आहेत रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 01:59 PM2021-07-27T13:59:55+5:302021-07-27T14:00:26+5:30

जर तुम्हाला देखील पोटातील गॅसच्या समस्येला सतत सामोरे जावे लागत असेल तर जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने ह समस्या दूर होते. हे पदार्थ तुमच्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात...

Gas, indigestion, bloating problem. These 13 ingredients in the kitchen are the best remedies and solutions | गॅस, अपचन, पोट फुगतंय? किचनमधले 'हे' १३ पदार्थ आहेत रामबाण उपाय

गॅस, अपचन, पोट फुगतंय? किचनमधले 'हे' १३ पदार्थ आहेत रामबाण उपाय

googlenewsNext

बहुतांश वेळा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्या पोटात गॅस निर्माण होऊ लागतो ज्यामुळे तीव्र पोटदुखी सुरू होते. जर तुम्हाला देखील पोटातील गॅसच्या समस्येला सतत सामोरे जावे लागत असेल तर जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने ह समस्या दूर होते. हे पदार्थ तुमच्या घरात अगदी सहज उपलब्ध होतील. न्युट्रिशनिस्ट वरुण कत्याल यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला याची माहिती दिली.

  1. अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर: आतड्यांना आमलीय माइक्रोएन्वायरमेंट प्रदान करतं आणि पचन इंजाइम्सला सक्रिय करतं. यामुळे पचनक्रिया मजबूत होते व गॅसमुळे पोटात होणा-या सूज, वेदना व अन्य लक्षणांना कमी करतं. रोज एक ग्लास पाण्यात दोन चमचे अ‍ॅप्पल साइडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने गॅस्ट्रिक पेनपासून मुक्ती मिळते.
  2. पेपरमिंटची चहा : तुम्ही चहा तर घेतच असाल. पण आता तुम्ही पेपरमिंटची चहा घेऊन पाहा. तुम्हाला गॅसच्या समस्यापासून आराम मिळू सकतो.
  3. आलं : आहारामध्ये आल्याचा वापर करा. आल्यामध्ये काही रासायनिक द्रव्य असतात ज्यामुळे तुम्ही गॅसच्या समस्येपासून दूर राहू शकता.
  4. जीरे : जीरं देखील गॅसच्या समस्येवर गुणकारी उपाय आहे. सकाळी थोडीशी जिरे पावडर काहीही खाण्यापूर्वी घ्या. तुम्हाला याचा फायदा होईल.
  5. भोपळा : भोपळ्याची भाजी गॅसच्या समस्येला दूर ठेवते. जेव्हा जेवन पचन होत नाही तेव्हा गॅस होतो त्यामुळे भोपळा हा पचनसाठी फायदेशीर आहे. 
  6. लिंबू पाणी : रोज सकाळी एक कप गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून तो प्यायल्याने गॅस पासून सुटका होते. काहीही खाण्यापूर्वी सकाळी लिंबाचा चहा जरी घेतला तरी आराम मिळतो.
  7. ओवा: तळहातावर ओवा थोडा चोळून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. तुम्हाला गॅस पटकन जायला हवा असेल तर तुम्ही ओवा चावताना तुम्ही त्यावर गरम पाणी प्यायले तरी चालू शकेल. 
  8. दही: दह्यात अनेक चांगले बॅक्टेरिया असतात जे पचन प्रक्रियेत खूप मदत करतात. दह्यात पाणी, जीरा पावडर व सैंधव मीठ घालून पिणं पोटासाठी खूपच लाभदायक असतं.
  9. हर्बल टी: हर्बल टीचं सेवन केल्याने पचनक्रिया एकदम सुरळीत पार पडते व मजबूतही होते. ज्यामुळे गॅस होऊन पोटात होणा-या वेदना दूर होतात. यासाठी आलं, पुदिना व केमोमाइल टी चं सेवन केलं जाऊ शकतं.
  10. बडीशेप: बडिशेप गॅस्ट्रिक पेन दूर करण्यास खूप कारक मानली जाते. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत व सुरळीत होते. यामध्ये काही महत्त्वपूर्ण योगिक असतात जे जेवण सहजपणे पचवण्यास मदत करतात. बडीशेप खाल्ल्याने अपचन व बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही.
  11. लवंग: सूज, गॅस्ट्रिक पेन, पोट फुगणं, बद्धकोष्ठता या सर्व समस्यांवर लवंग एक पारंपारिक उपाय मानली जाते. लवंग चघळल्याने किंवा जेवणा नंतर वेलची सोबत एक चमचा लवंगाच्या पावडरचं सेवन केल्याने पचन सुरळीत होते व गॅसची समस्या उद्भवत नाही.
  12. हिंग: कोमट पाण्यात आर्धा चमचा हिंग मिसळून सेवन केल्याने गॅसचा त्रास कमी होतो. हिंग अँटीफ्लैटुलेंटचे काम करते यामुळे पोटात गॅस तयार करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करते.
  13. दालचिनी: दालचीनी पोटात होणाऱ्या गॅसवर खूप फायदेमंद असते. एक कप गरम दुधात दालचिनी पावडर आणि मध मिसळून सेवन केल्याने पोटात गॅस कमी करण्यास खूप मदत होते.

Web Title: Gas, indigestion, bloating problem. These 13 ingredients in the kitchen are the best remedies and solutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.