'गॅस्ट्रो एन्टरायटिस'पासून सावध रहा; ही लक्षणं दिसली तर त्वरित उपचार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 01:48 PM2019-04-02T13:48:07+5:302019-04-02T13:49:36+5:30

गॅस्ट्रो एन्टरायटिस (Gastro enteritis) या आजारामध्ये सतत पोटाट जळजळ होत असते. पचनक्रियेवर बॅक्टरियाचा इफेक्ट झाल्यामुळे या आजाराचा सामना करावा लागतो. गॅस्ट्रोएन्टरायटिस हा आजारामध्ये पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Gastroenteritis disease symptoms and its remedie in marathi | 'गॅस्ट्रो एन्टरायटिस'पासून सावध रहा; ही लक्षणं दिसली तर त्वरित उपचार करा

'गॅस्ट्रो एन्टरायटिस'पासून सावध रहा; ही लक्षणं दिसली तर त्वरित उपचार करा

googlenewsNext

(Image Credit : medscape.com)

गॅस्ट्रो एन्टरायटिस (Gastro enteritis) या आजारामध्ये सतत पोटाट जळजळ होत असते. पचनक्रियेवर बॅक्टरियाचा इफेक्ट झाल्यामुळे या आजाराचा सामना करावा लागतो. गॅस्ट्रोएन्टरायटिस हा आजारामध्ये पोटाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटामध्ये सतत होणारी जळजळ ही बॅक्टेरिया, व्हायरस आणि प्रोटोजोआ(Protozoa) यांमुळे होते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक लोकांना ही समस्या दूषित पाणी किंवा अन्नपदार्थांचे सवन केल्यामुळे होते. तसेच या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळेही या आजाराचा सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यात तर या आजाराने अनेक लोक ग्रस्त असतात. कारण हे वातावरण या आजाराला कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया वाढविण्यासाठी अनुकूल असते. गॅस्ट्रो एन्टरायटिस या आजाराची लक्षणं दिसून आल्यानंतर जर पाच दिवसांपर्यंत आराम मिळाला नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

कारणं

- पचनक्रियेमध्ये काही विषारी तत्व असल्याने आतड्यांमध्ये जळजळ होते आणि सूज येते. 

- जे पदार्थ पचण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनाने या आजाराचा सामना करावा लागतो. 

- अलर्जी असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला हा आजार होऊ शकतो.

- अ‍ॅलर्जी असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यानेही या आजाराचा सामना करावा लागतो. 

- दूषित खाद्य पदार्थ खाल्यानेही हा आजार होण्याची शक्यता असते. 

लक्षणं

- डायरिया हे गॅस्ट्रो एन्टरायटिस या आजारांच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहेत. जेव्हा बॅक्टेरिया किंवा वायरस आतड्यांवर आक्रमण करतात. यामध्ये फ्लुइड (Fluid) तयार होणं अत्यंत अवघड असतं. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती फार लवकर डिहायड्रेट होतात. 

- जर डायरियाने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांना उलट्याही होत असतील तर डिहायड्रेशन आणखी धोकादायक ठरतं. सुरुवातीमध्ये रूग्णांना फक्त 2 ते 3 वेळा फक्त उलट्या होतात. परंतु यामुळे जास्त प्रमाणात उलट्या होत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं. 

- गॅस्ट्रो एन्टरायटिस दरम्यान होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे अनेक लोकांमध्ये असं दिसून आलं की, त्यांच वजन फार कमी होत आहे. अधिक प्रमाणात शरीरातून पाणी कमी झाल्यामुळे आणि त्याचबरोबर भूक कमी लागल्यामुळे असं होऊ लागतं. योग्य वेळी यावर उपचार केले तर यापासून सुटका करणं सहज शक्य होतं. 

- डोकेदुखी आणि ताप येणं

- गॅस्ट्रो एन्टरायटिसमुळे पीडित असणाऱ्या लोकांना सांधेदुखी, थकवा येणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

बचाव 

- साफ-सफाई असणाऱ्या ठिकाणींच जेवण करा

- स्वच्छ पाणी प्या. तसेच, पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करा. 

- स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर भाज्या तयार करताना स्वच्छ करून त्यानंतरच शिजवा. 

- शिळे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. 

- फार त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Gastroenteritis disease symptoms and its remedie in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.