फक्त 'या' सवयीने मिळवा तजलेदार त्वचा, विसरून जाल महागडे क्रिम्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 09:25 PM2021-06-27T21:25:04+5:302021-06-27T21:25:45+5:30
प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याला चमकदार आणि हेल्दी त्वचा मिळावी. आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या क्रिम किंवा उत्पादनांची गरज नाही.
प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याला चमकदार आणि हेल्दी त्वचा मिळावी. आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या क्रिम किंवा उत्पादनांची गरज नाही. जर चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर, दररोज सकाळी लवकर उठा आणि रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्या. सकाळी पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक बाहेर निघून जातात आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात त्वचेला विशिष्ट प्रकारचा उजळ रंग येतो पाणी त्वचेला नैसर्गिक रुपाने हायड्रेटेड आणि मॉईस्चराइज ठेवते.
सकाळी पाणी प्यायल्याने आपल्या मेटाबॉलिज्मचा रेट वाढवण्यास मदत होते. आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये वाढ होण्याचा अर्थ म्हणजे आपण दैनंदिन जास्त प्रमाणात कॅलरी बर्न करीत आहोत. भूक कमी अर्थात पोटात जेवण कमी जात असेल तर पाणी प्यायला आहे. त्यामुळे पोट भरलेले राहते. घामातून अतिरिक्त चरबी निघून गेल्याने शरीर निरोगी होते. तसेच, आपल्याला चमकणारी आणि निरोगी त्वचा प्राप्त होते. व्यायामामुळे त्वचेतील कोलेजेनचे उत्पादन सुधारते. पाण्याची हायड्रेशनसाठी मोठी मदत होते. त्यातूनच लाळ बनण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. आपल्या तोंडात लाळ बनणे महत्त्वपूर्ण आहे. कारण तोंड जर कोरडे असेल तर आपल्याला कोरड्या तोंडावाटे आजारपण येऊ शकते. यातून मधुमेहासारख्या गंभीर आजारालाही निमंत्रण मिळू शकते