'मुंबई-श्री' आणि त्याच्या प्रशिक्षकांचा बॉडिबिल्डींगचा फिटनेस फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 01:51 PM2019-02-25T13:51:27+5:302019-02-25T13:56:13+5:30
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मुंबई-श्री' या स्पर्धेमध्ये अनिल बिलावाने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 'नवोदित मुंबई श्री' आणि 'मुंबई श्री' असे दोन्ही पुरस्कार पटकावून या स्पर्धेच्या इतिहासातिल तो पहिला बॉडीबिल्डर ठरला.
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मुंबई-श्री' या स्पर्धेमध्ये अनिल बिलावाने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 'नवोदित मुंबई श्री' आणि 'मुंबई श्री' असे दोन्ही पुरस्कार पटकावून या स्पर्धेच्या इतिहासातिल तो पहिला बॉडीबिल्डर ठरला. अनिलच्या या यशामध्ये त्याला घडविणारे त्याचे प्रशिक्षक संजय चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. जसा एकादा मूर्तीकार एकादी मूर्ती घडवतो, तशी संयज चव्हाणांनी अनिल बिलावाच्या शरीराला सुदृढ बनवले. अवघ्या सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर 80 किलो वजनी गटामध्ये अनिलने संजय चव्हाणांच्या साथीने जेतेपदाचा किताब आपल्या खिशात घातला.
आपण सर्वच जाणतो, बॉडीबिल्डीग करणं सोप काम नव्हे. आपले अथक परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरोवर अनिलने या स्पर्धेत इतिहास रचला. अनिल प्रमाणेच अनेक तरूणांच सुदृढ शरीर तयार करण्याचं स्वप्न असतं. सिक्स पॅक्स, बायसेप्स प्रत्येक तरूणांना भूरळ घालत असतात. पण या सर्व गोष्टींमध्ये भूरळून न जाता. सेफली बॉडी बिल्डींग करणं अत्यंत आवश्यक असतं. यानिमित्ताने लोकमतच्या टीमने 'नवोदित मुंबई श्री' आणि 'मुंबई श्री' ठरलेल्या अनिल बिलावासह त्याचे प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्याशी संवाद साधला. त्यानिमित्तान त्यांनी बॉडिबिल्डींगकडे आकर्षित होणाऱ्या तरूणांना काही मोलाचे सल्ले दिले. जाणून घेऊया या गुरू शिष्याच्या जोडीने दिलेल्या काही खास बॉडि बिल्डिंग टिप्स...
बॉडिबिल्डींग म्हटलं की समतोल आहार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेक तरूणांचा असा गैरसमज असतो की, आपण भरपूर प्रोटीन्स असणारं डाएट घेतलं किंवा प्रोटीन शेक घेतला तर आपणही सिक्स पॅक्स मध्ये मिरवू शकतो, पण तसं नाही. याबाबत बोलताना संजय चव्हाण यांनी सांगितले की, बॉडिबिल्डींगचे प्रामुख्याने दोन पार्ट असतात. ऑफसिझन म्हणजेच याप्रकारामध्ये बॉडि गेन करण्यात येते आणि दुसरा सिझन म्हणजे ऑन सिझन म्हणजेच कॉम्पिटिशनच्या आधीचा सिझन. या दोन्ही प्रकारांमध्ये देणात येणारं डाएट आणि एक्सरसाइज या वेगवेगळ्या असतात. हे सर्व तुमच्या बॉडिटाइपनुसार ठरविण्यात येतं. एवढचं नाही तर यांना देणाऱ्या आहारामध्येही दोन गोष्टी येतात. एक म्हणजे, मॅक्रो-न्यूट्रिएन्स आणि मायक्रो-न्यूट्रिएन्स. मॅक्रो-न्यूट्रिएन्समध्ये प्रामुख्याने प्रोटीन्स, कार्ब्स आणि फॅट्सचा समावेश होतो. तर मायक्रो-न्यूट्रिएन्समध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या सर्व गोष्टींचा समावेश होतो. शरीर घडवण्यासाठी या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. शरीराच्या गरजेनुसार ही सर्व पोषक तत्व कमी-जास्त प्रमाणात असतात.'
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, आपण सर्वचजण सध्या बाहेरील पदार्थ किंवा जंक फूडच्या आहारी गेलो आहोत. याबाबत बोलताना प्रशिधकांनी सांगितले की, खरं तर आपल्या शरीराला जंक फूडपेक्षा समतोल आहाराची गरज असते. हा फंडा फारसा नवीन नसून खरं तर हा फंडा आपल्या शास्त्रामध्येच सांगितला आहे. सकाळचा पोटभर नाश्ता... त्यानंतर दुपारचं जेवणं आणि अगदी थोडसं रात्रीचं जेवण. हा फंडा अगदी सामान्यांनाही उपयोगी पडतो. करं तर यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे नाश्ता. कारण आपण जेव्हा सकाळी उठतो. त्यावेळी आपल्या शरीराला शुगरची गरज असते. त्यामुळे तेव्हा तुम्ही कितीही खाल्लं तरी तुम्हाला काहीही त्रास होत नाही. म्हणूनचं जर सकाळी हेल्दी नाश्ता केला तर ते शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त फळंही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
गेल्या काही दिवसांपासून अति एक्सरसाइज केल्यामुळे किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय एक्सरसाइज केल्यामुळे जिममध्ये अनेक दुर्घटना घडल्याचे आपण सारेच जाणतो. यावर बोलताना प्रशिक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की, खरं तर बॉडि बिल्डींग करताना डाएट आणि एक्सरसाइज या दोनच गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे अनेकदा काही तरूण मंडळी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवायच अनेक गोष्टी करत असतात. पण ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे दुर्घटना घडतात. त्याऐवजी जर तुम्ही व्यवस्थित तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर सर्व गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला सुडौल आणि सुदृढ शरीर मिळण्यास मदत होते.