हार्टबर्नची समस्या होईल नेहमीची दूर, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:23 AM2019-08-21T10:23:58+5:302019-08-21T10:32:20+5:30

अनेकदा अधिक तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ(हार्टबर्न) होण्याची समस्या सुरू होते. छातीत जळजळ होत असल्याने ना काही खाण्याची इच्छा होत ना शांतपणे बसता येत. रात्री शांतपणे झोपताही येत नाही.

Get relief from heartburn by eating these foods | हार्टबर्नची समस्या होईल नेहमीची दूर, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश!

हार्टबर्नची समस्या होईल नेहमीची दूर, डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश!

Next

(Image Credit : parkview.com) 

अनेकदा अधिक तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ(हार्टबर्न) होण्याची समस्या सुरू होते. छातीत जळजळ होत असल्याने ना काही खाण्याची इच्छा होत ना शांतपणे बसता येत. रात्री शांतपणे झोपताही येत नाही. अ‍ॅसिडिटी होणे किंवा छातीत जळजळ होणे पचनासंबंधी एक समस्या आहे. जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात, यात अनेकदा हृदयासंबंधी आजारांची लक्षणेही असू शकतात. जर तुम्हाला ही समस्या नेहमी नेहमी होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगलं ठरेल. अ‍ॅसिडीटीच्या कॉमन लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणे, बर्निंग पेन, आंबट ढेकर, घशात किंवा तोंडात सूज, उचकी, काहीही कारण नसताना वजन कमी होणे आणि उलटी होणे हे आहेत. 

या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

(Image Credit : genesismedical.co.za)

गॅसची समस्येकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. गरजेचं नाही की, हा हृदयासंबंधी काही आजार असावा. पण असं सतत होत असेल तर वेळीच यावर उपचार घ्या. काही उलट-सुलट खाण्याने हार्ट बर्न होणे, गॅस होणे आणि हृदयासंबंधी रोगांमध्ये बराच फरक असतो. तुम्ही काही खास फूड्सचा डाएटमध्ये समावेश करून बघा, छातीत होणारी जळजळ आणि अ‍ॅसिडीटीपासून सुटका मिळेल.

करा हे उपाय

१) पपई खावी. पपईने अ‍ॅसिडीटी कमी होते. पपईमध्ये पॅपेन एंजाइम असतं, जे पचनक्रिया सुधारतं. तसेच यातील फायबर तत्वांमुळे पोटातील टॉक्सिन्स बाहेर काढले जातात. जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या नेहमी होत असेल तर पपईचा डाएटमध्ये समावेश करा.

(Image Credit : ghamasan.com)

२) काही आयुर्वेदिक उपयांनी देखील ही छातीत होणारी जळजळ दूर केली जाऊ शकते. अ‍ॅलोव्हेरा ज्यूस पोटाच्या लायनिंगला आराम देतात. पुदीना सुद्धा गॅसची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं.

३) आंबट फळे जसे की, संत्री, लिंबू यात एल्कलाइन तत्त्व असतं. यानेही अ‍ॅसिडीटीची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

(Image Credit : www.hotelroomsearch.net)

४) नारळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणत असतं आणि शरीरासाठी हे एक चांगलं डिटॉक्सिफिकेशन म्हणून काम करतं. जर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची आणि अ‍ॅसिडीटीची समस्या असेल नारळाचं पाणी सेवन करा.

५) दही पोटाला थंड ठेवतं. दह्यात नैसर्गिक बॅक्टेरिया असतात. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच हे बॅक्टेरिया पोटात अ‍ॅसिड तयार होऊ देत नाहीत. त्यामुळे दही सुद्धा फायद्याचं ठरतं.

(Image Credit : indiamart.com)

६) केळी खाणंही पोटासाठी हेल्दी असतं. यातील असलेले इनफ्लेमेटरी तत्व आतड्यांना येणारी सूज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. तसेच केळ्यात असलेलं फायबर हे निश्चित करतं की, आतड्यांची क्रिया व्यवस्थित व्हावी. 

७) आलं हे सुद्धा अनेकदा औषधी म्हणून वापरलं जातं. यानेही गॅस कमी करून अ‍ॅसिडीटीपासून आराम मिळतो.

Web Title: Get relief from heartburn by eating these foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.