उचकी थांबवण्यासाठी 'हे' उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 02:26 PM2018-07-12T14:26:04+5:302018-07-12T14:26:20+5:30

उचकी लागणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. कधी कधी अचानक उचकी लागली की आपण लगेच पाणी पितो. पण काहीजणांची उचकी पाणी प्यायल्यानंतरही थांबत नाही.

get rid of hiccups with quick tricks | उचकी थांबवण्यासाठी 'हे' उपाय करा!

उचकी थांबवण्यासाठी 'हे' उपाय करा!

Next

उचकी लागणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. कधी कधी अचानक उचकी लागली की आपण लगेच पाणी पितो. पण काहीजणांची उचकी पाणी प्यायल्यानंतरही थांबत नाही. अशावेळी घाबरून जाण्याची गरज नाही. काही उपाय केल्यानंतर ही समस्या दूर होण्यास मदत होते. उचकी लागल्यानंतर ती थांबेपर्यंत फार अस्वस्थ व्हायला होतं. त्यामुळे ती थांबवणे गरजेचे असते. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.

1. मध

एक चमचा मधात थोडे कोमट पाणी टाकून ते प्यावे.

2. गोड पदार्थ खा

जर उचकीने हैराण झाले असाल तर एक चमचा साखर खा. साखरेचे दाणे अन्ननलिकेला मोकळे करतात आणि उचकी थांबते. याला वैज्ञानिकदृष्ट्या काहीही आधार नाही. पण आजीच्या बटव्यातलं हे एक गुपित आहे. जर जवळ साखर नसेल तर चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाल्ला तरी उचकी थांबते.

3. आंबट पदार्थ

लिंबू किंवा एखादे लोणचेही चाखल्यास उचकी थांबते. लिंब, कैरी, टॉमेटोच्या फोडी करून खाल्ल्यानेही उचकी थांबते.

4. चॉकलेट पावडर

उचकी लागल्यास एक चमचा चॉकलेट पावडर खावी. चॉकलेट पावडर खाल्ल्याने काही वेळात उचकी बंद होते.

5. पीनट बटर

पीनट बटर खाताना दात व जीभेचा वापर होतो. यामुळे श्वसन प्रक्रियेत अडथळा येऊन उचकी थांबते.

6. काळी मिरी 

तीन काळी मिरी आणि खडीसाखर तोडात ठेऊन चावा आणि त्याचा रस प्या. त्यावर एक घोट पाणी पण पिऊ शकतात. त्यानंतर उचकी बंद होईल.

7. हाताचा अंगठा

जर उचकी थांबवण्यासाठी तुमच्याकडे कुठलीच गोष्ट उपलब्ध नसेल तर एका हातावर दुसऱ्या हाताच्या अंगठयाने जोरात दाबावे. यामुळे थोड्याच वेळात उचकी थांबते.

8. गाणी ऐका, नाचा

जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक उचकी लागली. पण जवळ पाणीही नसेल तर सरळ इयरफोन कानात टाका आणि गाणी ऐकायला सुरुवात करा. जमलं तर नाचा. यामुळे उचकीकडे तुमचे दुर्लक्ष होईल व उचकी आपोआपच थांबेल.

9. श्वसनाचे व्यायाम

ज्यांना सतत उचकीचा त्रास होत असेल त्यांनी नियमित श्वसनाचे व्यायाम करावेत.

Web Title: get rid of hiccups with quick tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.