काखेतील काळे डाग दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:41 AM2024-08-12T11:41:15+5:302024-08-12T12:21:54+5:30
Dark Under arms : आज काही घरगुती उपाय आणि अंडरआर्म्समध्ये काळे डाग होण्याची कारणे सांगणार आहोत.
Dark Under arms : सामान्यपणे सगळेच लोक आपल्या शरीराची स्वच्छता करतात. पण अनेकजण नाभि आणि अंडरआर्म्सच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. महिला असो वा पुरूष त्यांचे अंडरआर्म्स काळे असतात. हे काळे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण या उपायांनी त्यांना काही फायदा मिळत नाही. अशात आज काही घरगुती उपाय आणि अंडरआर्म्समध्ये काळे डाग होण्याची कारणे सांगणार आहोत.
या कारणांनी अंडरआर्म्स होतात काळे
- वेळोवेळी अंडरआर्म्सची स्वच्छता न करणे
- वेळेवर अंडरआर्म्सचे केस क्लीन न करणे
- चुकीचे डिओ वापरल्याने
- अधिक घट्ट कपडे परिधान करणे
- कशातरी इन्फेक्शनमुळे
- स्मोक केल्याने संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो, ज्यात अंडरआर्म्सचाही समावेश होतो.
उपाय
१) अंडरआर्म्स शेव्ह करु नका तर वॅक्सिंग करा. यामुळे काळे डाग पडत नाही आणि त्वचा मुलायम राहते.
२) जे सूट होत नाहीत ते डिओड्रंट काखांमध्ये कधीच लावू नका. त्यामुळेही काखा डार्क होतात.
३) बटाट्याचा रस काढा आणि १० मिनिटे काखेत चोळा.
४) लिंबूचे छिलके काखेत लावल्यानेही काळा रंग निघून जाण्यास मदत होते. यामुळे त्याठिकाणची मृत त्वचाही निघून जाण्यास मदत होते.
५) काकडीमध्येही ब्लिचींग एजंट असतात. काकडीच्या रसात थोडा लिंबूरस आणि हळद मिसळा. या पेस्टला ३० मिनिटे लावून ठेवा. हळूहळू रंग उजळण्यास मदत होईल.
6) बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि त्याची हलकी पेस्ट बनवा. या पेस्टने काखेमध्ये स्क्रब करा. आठवड्यातून दोन वेळा याचा प्रयोग करा.
7) प्रमाणापेक्षा जास्त घट्ट कपडे परिधान केल्यास अंडरआर्म्सची स्कीन काळी पडते. घट्ट कपड्यांमुळे घर्षण होतं, जे इन्फेक्शनमध्ये बदलतं. त्यामुळे जास्त घट्ट कपडे वापरु नका.