सततच्या स्ट्रेसमुळे झाले असाल हैराण तर 'या' टिप्स देतील तुम्हाला नवं जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:09 PM2019-12-11T12:09:11+5:302019-12-11T12:14:50+5:30

ऑफिस, घर आणि रिलेशनशिपमध्ये प्रत्येकालाच काहीना काही अडचणी येत असतात. या अडचणी आधी स्ट्रेस, नंतर टेन्शन आणि मग डिप्रेशनचं कारण ठरतात.

Get rid of stress with these five easy steps know symptoms | सततच्या स्ट्रेसमुळे झाले असाल हैराण तर 'या' टिप्स देतील तुम्हाला नवं जीवन!

सततच्या स्ट्रेसमुळे झाले असाल हैराण तर 'या' टिप्स देतील तुम्हाला नवं जीवन!

Next

(Image Credit : okotokstoday.ca)

ऑफिस, घर आणि रिलेशनशिपमध्ये प्रत्येकालाच काहीना काही अडचणी येत असतात. या अडचणी आधी स्ट्रेस, नंतर टेन्शन आणि मग डिप्रेशनचं कारण ठरतात. रोजच्या जीवनात लोक स्वत:साठी वेळ काढणं हळूहळू विसरत चालले आहेत. ना ते योग्य आहार घेत, ना एक्सरसाइज करत आणि ना लोकांची सोशल लाइफ चांगली आहे. यात सर्वात जास्त प्रभावित होते झोप.

झोप पूर्ण न होणे किंवा अनिद्रेमुळे स्ट्रेसचं प्रमाण वेगाने वाढतं आणि इथेच वेगवेगळ्या समस्यांचं मूळ आहे. कोणत्याही अडचणीतून किंवा स्ट्रेसमधून बाहेर पडण्याची एक पद्धत आहे. तुम्हालाच तुमची समस्या सोडवावी लागेल, त्यासाठी दुसरं कुणी येणार नाही.

(Image Credit : roberthalf.com)

सर्वातआधी तर समस्या समजून घ्यावी आणि त्यावर उपायासाठी पर्याय निवडा. समस्या दूर करणं सोपं काम नसतं, पण अशक्यही नाही. तुम्हाला जर समस्येवर उपाय सापडत नसेल तर तुम्हाला स्वत:ला तसं तयार करावं लागेल. स्वत:त बदल करावे लागतील आणि आपली लाइफस्टाईल सुरळीत करावी लागेल.

स्वत:ला लढण्यासाठी करा तयार

(Image Credit : womenshealth.gov)

अनेक वैज्ञानिक रूपाने हे सिद्ध झालं आहे की, तुमच्या एखाद्या गोष्टीपासून जेवढे दूर पळता, ती गोष्ट तेवढी तुमच्या मागे लागते. अशात त्या गोष्टीचा तुम्हाला तणाव होत असेल किंवा तुम्ही दु:खी होत असाल तर त्या गोष्टी सामना करायला शिका. स्ट्रेस तुमच्यासमोर फारच सामान्य आहे असा विचार करा आणि स्ट्रेसला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.

सकारात्मक विचार स्ट्रेस दूर करण्याचं औषध आहे. जेव्हा समस्या समोर असेल तेव्हा मनातल्या मनात भिती बाळगू नका. हा विचार करा की, या समस्येतून बाहेर याल तेव्हा तुम्ही किती सशक्त व्हाल. समस्या तुम्हाला मजबूत करत असतात आणि तुम्ही जीवनाकडे प्रॅक्टिकल पद्धतीने बघायला लागता.

तुमचे प्लस पॉइंट शोधा

समस्या काय आहे हे न समजू शकणं किंवा कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला स्ट्रेस येतोय हे न समजणं जास्त धोकादायक असतं. त्यामुळे तुमचे प्लस पॉइंट शोधा आणि समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे पर्याय शोधा ऑफिसमध्ये तुमचा बॉस तुमच्या कामाने संतुष्ट नसेल तर त्यांच्याशी बोला.

(Image Credit : heart.org)

बॉसकडून सुधारणेसाठी टिप्स घ्या. यात संकोच करू नका, तुमचा तणाव यानेच दूर करा. जर रिलेशनशिपमध्ये काही समस्या असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा किंवा समस्या सोडवण्यावर दोघांनी बोला. बोलूनच समस्या दूर होऊ शकते.

 श्वासाचं महत्व जाणा

जेव्हाही तुम्हाला फार चिंता वाटत असेल तर तेव्हा हळूवार मोठा श्वास घेण्यास सुरूवात करा आणि आपल्या श्वासावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही मोठा श्वास घेता तेव्हा तुमच्या हृदयाची गती कमी होते आणि हृदय तुमच्या मेंदूला संकेत पाठवतो की, सगळं काही ठीक आहे. घाबरण्याची अजिबात गरज नाही.

(Image Credit : allinahealth.org)

स्ट्रेस दूर करण्यासाठी आहारही तेवढाच चांगलं असणं महत्वाचं आहे. त्यासाठी आहारात केळी, डाळिंब, टोमॅटो, संत्री इत्यादींचा समावेश करा. डार्क चॉकलेटचंही सेवन करू शकता. तसेच चहा आणि कॉफीचं सेवन कमी करा.


Web Title: Get rid of stress with these five easy steps know symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.