मुतखड्याच्या असह्य वेदनांपासून मिळवा त्वरित सुटका, आयुर्वेदातील एक खास उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:57 PM2021-06-11T18:57:36+5:302021-06-11T18:59:18+5:30
आज आम्ही तुम्हाला असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे काही कालावधीतच तुमचा मुतखडा लघवीतून पडण्याची शक्यता आहे...
प्रसुतीमध्ये ज्या प्रमाणे कळा मारतात त्याहीपेक्षा वाईट कळा मुतखडा मुत्रनलिकेत अडकल्यावर मारतात. जे या आजारातून गेले आहेत त्यांनाच केवळ या वेदना समजू शकतात. पण खरंच कोणीही या वेदनांमधुन जाऊ नये असा विचार करणेच योग्य. आज आम्ही तुम्हाला असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे काही कालावधीतच तुमचा मुतखडा लघवीतून पडण्याची शक्यता आहे. डॉ. अबरार मुल्तानी यांनी हा उपाय झी न्युजच्या संकेतस्थळाला सांगितला आहे. हा उपाय आपण पाहणारच आहोत पण त्या आधी पाहणार आहोत की मुतखडा कसा तयार होतो.
अशाप्रकारे तयार होतो मुतखडा-
मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.
मुतखडा लघवीच्या नलिकेत अडकल्यावर काय त्रास होतो ?
मुतखडा मुत्रनलिकेत अडकल्याने असह्य वेदना होतात. तसेच लघवी करण्यास फार त्रास होतो. त्याचबरोबर मळमळ आणि उलटी होऊ शकते. मुतखडा हा चूकीची जीवनशैली, आहार, वाढलेले वजन, काही औषधांचे साईडइफेक्ट्स यामुळे होऊ शकतो.
मुतखडा काढण्याचा आयुर्वेदिक उपाय
डॉ. मुल्तानी यांनी दिलेल्या माहितीनूसार आयुर्वेदात एक असा उपाय आहे ज्यामुळे दोन ते तीन दिवसात मुतखडा शरीरातून बाहेर काढता येतो. त्यासाठी तुम्ही एक केळ घ्या, त्यात दोन तीन पेपरमिंटचे तुकडे टाका. हे खा. त्यानंतर अर्धा ग्लास गरम दूध आणि अर्धा ग्लास कोमट पाणी प्या. दोन ते तीन दिवसात मुत्रनलिकेतून मुत्राद्वारे मुतखडा बाहेर पडेल.