पावसाळ्यात आउटिंगला जाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. तुम्ही काही प्लॅन केलाय का? सूचत नसल्यास हे वाचा आणि ठरवा!
By admin | Published: July 13, 2017 04:27 PM2017-07-13T16:27:29+5:302017-07-13T16:27:29+5:30
पाऊस केवळ खिडकीतूनच न बघता, यंदा मस्त भिजायला, मन चिंब चिंब करायला नक्की बाहेर पडा. परत याल तेव्हा नवं काही मनात रु जल्याचं तुम्हालाही नक्की जाणवेल!
-अमृता कदम
पावसानं मध्यंतरी घेतलेली सुट्टी कदाचित आता संपत आल्याची चिन्हं वातावरणात दिसता आहेत. पण जूनमध्ये झालेल्या दमदार पावसाच्या जोरावर निसर्ग मात्र हिरवागार झाला आहे. संपूर्ण सृष्टीतून एक चैतन्याचा प्रवाह वाहू लागला आहे. अशा वातावरणात हातातली कामं थोडी बाजूला ठेवून हिरव्यागार झालेल्या या सृष्टीशी काही क्षण का होइना पण एकरूप व्हायला कोणाला आवडणार नाही बरं?
रस्ते, रेल्वे सुविधेचं जाळं अगदी छोट्या शहरांपर्यंतही पोहचल्यानं अशी नवनवी पावसाळी ठिकाणं शोधण्यात लोकांचा रस वाढतोय. गोवा, केरळ आजही पावसाळ्यातल्या टूरसाठी अगदी टॉपवरच असले तरी बेकाल, हंपीसारख्या काही नव्या ठिकाणांचाही या यादीत समावेश होतोय.
त्यामुळे पाऊस केवळ खिडकीतूनच न बघता, यंदा मस्त भिजायला, मन चिंब चिंब करायला नक्की बाहेर पडा. परत याल तेव्हा नवं काही मनात रु जल्याचं तुम्हालाही नक्की जाणवेल!