नाकातील केस काढल्याने होऊ शकतात गंभीर समस्या, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 02:42 PM2022-06-30T14:42:33+5:302022-06-30T14:42:44+5:30
Nose hair : गेल्या काही काळापासून नाकाच्या वॅक्सिंगचा ट्रेन्ड वाढला आहे. यासाठी नॉस्ट्रिलवर वॅक्स लावून ते सुकू दिलं जातं आणि नंतर हेप्लिकेटरच्या मदतीने वॅक्ससोबतच नाकातील केसही काढले जातात. ही एक नॉर्मल प्रोसेस आहे.
Nose hair : आजच्या काळात केवळ महिलाच नाही तर पुरूषही वॅक्स करतात. प्रत्येकजण शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वॅक्सिंग करतात. यात नोज हेअर रिमुव्ह करण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. नाकातील केस दिसायला अजिबात चांगले वाटत नाहीत आणि त्यामुळे लोक हे केस काढतात. गेल्या काही काळापासून नाकाच्या वॅक्सिंगचा ट्रेन्ड वाढला आहे. यासाठी नॉस्ट्रिलवर वॅक्स लावून ते सुकू दिलं जातं आणि नंतर हेप्लिकेटरच्या मदतीने वॅक्ससोबतच नाकातील केसही काढले जातात. ही एक नॉर्मल प्रोसेस आहे.
बॉडी वॅक्ससारखं काम करते ही पद्धत
नाकातील केस काढणं तुम्हाला चांगलं वाटत असेल, पण हे तुमच्या आरोग्यासाठी फार नुकसानकारक ठरू शकतं. जेव्हा नाकातील केस मुळपासून काढले जातात तेव्हा याने मेंदूत जीवघेणं संक्रमण होण्याची शक्यता वाढते. अशात नाकातील केस काढल्याने आरोग्याला कोणतं नुकसान होतं हे माहीत असलं पाहिजे.
काय आहे नोज वॅक्सिंग
नाकाची वॅक्सिंग ही एक सामान्य वॅक्सिंगसारखीच आहे. ज्यात नाकापुड्यांमध्ये वॅक्स टाकलं जातं. सोबतच एप्लिकेटर नाकात ठेवलं जातं. काही सेकंदानी ते बाहेर काढलं जातं. ही एक वेदनादायी प्रक्रिय आहे. ज्याद्वारे नाकातील केस काढले जातात.
नाकातील केस काढल्याने काय होतात नुकसान?
नाकातील केस दोन प्रकारचे असतात. मायक्रोस्कोपिक सिलिया आणि वायब्रिसे. जेव्हा वॅक्सिंग करून नाकातील केस बाहेर काढले जातात तेव्हा याने रोमच्या आजूबाजूचे कीटाणू आता जाण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे संक्रमणाचा धोका होऊ शकतो. हे संक्रमण नाकाच्या ट्रायएंगल भागाला प्रभावित करू शकतं.
इथे लक्ष देण्याची ही बाब आहे की, नाकातील रक्तवाहिन्या मेंदूपासून रक्त आणणाऱ्या नसांना कनेक्ट असतात. ज्याद्वारे हे कीटाणू तुमच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. सोबतच जर कीटाणू मेंदूच्या मागच्या बाजूपर्यंत पोहोचले तर यामुळे मेंदूवर सूजही येऊ शकते. पण जर तुम्ही रोगप्रतिकार शक्ती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासोबतच जर नाकातील केसांवर वॅक्स केलं तर याने इमग्रोन हेअरची समस्या होऊ शकते. ज्याने नाकातील संवेदनशील टिश्यूला नुकसान पोहोचतं.
काय गरजेचे आहेत नाकातील केस?
भलेही नाकातील केस चांगले दिसत नसले तरी ते नाकात असणे आवश्यक आहे. नाकातील केस एका प्रोटेक्टिव लेअरसारखं काम करतात. ते नाकात बॅक्टेरिया - अॅलर्जी जाण्यापासून रोखतात. नाकातील जास्त केस काढण्याचा अर्थ हा आहे की, अॅलर्जी होणे किंवा अस्थमाने ग्रस्त लोकही अॅलर्जीने ग्रस्त होऊ शकतात. अनेक आजारांचा धोका अधिक वाढतो. अशात नाकातील केस अजिबात काढू नका.