Excessive oxygen intake : घरात जास्तवेळ ऑक्सिजन घेतल्यानं फुफ्फुसांमध्ये जाणवतोय थकवा; मृत्यूदर वाढण्याचं असू शकतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 01:49 PM2021-05-13T13:49:39+5:302021-05-13T14:11:18+5:30

Excessive oxygen intake : अनुभवी कर्मचार्‍यांशिवाय इतरांकडून ऑक्सिजन घेताना अनेक चुका केल्या जातात. सतत जास्त प्रमाणात डोस घेतल्यामुळे लोकांचे फुफ्फुस थकते. फुफ्फुसातील संसर्ग वाढत गेल्यानं हळूहळू ते ब्लॉक होऊ लागले. ज्यामुळे रुग्ण मृत्यूच्या तोंडापर्यंत पोहोचतो.''

Ghaziabad Excessive oxygen intake at home can cause fatigue in the lungs, which may be increased mortality. | Excessive oxygen intake : घरात जास्तवेळ ऑक्सिजन घेतल्यानं फुफ्फुसांमध्ये जाणवतोय थकवा; मृत्यूदर वाढण्याचं असू शकतं कारण

Excessive oxygen intake : घरात जास्तवेळ ऑक्सिजन घेतल्यानं फुफ्फुसांमध्ये जाणवतोय थकवा; मृत्यूदर वाढण्याचं असू शकतं कारण

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या कहरात रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यानं जास्तीत जास्त लोक होम आयसोलेशनमध्ये राहाणं पसंत करत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्तीत जास्तवेळा ऑक्सिजन घेतल्यानं रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये थकवा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या हेवी डोसमुळे बहुतेक लोकांची प्रकृती खालावत चालली आहे आणि मृत्यु दर सुधारण्याऐवजी वाढत आहे.

कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटात एप्रिलमध्ये संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार गाझियाबादमध्ये, कित्येक दिवसांपासून दररोज 1200 ते 1500 लोकांना  संसर्गाचा सामना करावा लागत आहे. एका वेळेची सक्रिय प्रकरणांची संख्या 6800 वर पोहोचली होती, गाझियाबाद जिल्ह्यात सामान्य बेड 3200 आणि आयसीयू बेड 773 आहेत.

म्हणजेच तीन हजाराहून अधिक बेड नसल्यामुळे जिल्हा संघर्ष करीत होता. सर्व सरकारी आणि खासगी कोविड रुग्णालयांचे बेड भरले आहे. म्हणून आरोग्य विभागाने रुग्णांना घरी आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी दिली. 

१० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

डॉक्टर म्हणतात की ''अनुभवी कर्मचार्‍यांशिवाय इतरांकडून ऑक्सिजन घेताना अनेक चुका केल्या जातात. सतत जास्त प्रमाणात डोस घेतल्यामुळे लोकांचे फुफ्फुस थकते. फुफ्फुसातील संसर्ग वाढत गेल्यानं हळूहळू ते ब्लॉक होऊ लागले. ज्यामुळे रुग्ण मृत्यूच्या तोंडापर्यंत पोहोचतो.''

आधी जीभ खाल्ली मग स्वतःची जागा मिळवली; माश्याच्या तोंडात आढळला लिंग बदलणारा किडा

१) डॉक्टर मिथिलेशकुमार यांच्या म्हणण्यानुसार होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांनी अधिक काळजी घ्यावी. डॉक्टरांशी सतत संपर्कात रहावे.

२)  गरज नसल्यास ऑक्सिजन घेणं टाळा. जर ऑक्सिजनची पातळी 90 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर उपचारांसाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि सल्ला घेतल्यानंतर ऑक्सिजन देण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

३) वैद्यकीय सल्ल्याशिवाय रुग्णाला बराच काळ ऑक्सिजन देऊ नका. त्यांना तीन ते चार तासांत रुग्णालयात दाखल करा. 

४) मधुमेह, बीपी, प्रत्यारोपण आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना  ९४ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन पातळी पोहोचताच त्यांना रुग्णालयात दाखल करावे.
 

Web Title: Ghaziabad Excessive oxygen intake at home can cause fatigue in the lungs, which may be increased mortality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.