बहुगुणी आले! पावसाळ्यात 'या' गंभीर समस्या दूर करतं चुटकीसरशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 02:58 PM2022-08-22T14:58:07+5:302022-08-22T15:00:02+5:30

जाणून घेऊया पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे किती फायदेशीर आहे आणि आपण त्याचा (Health Benefits Of Ginger During Monsoon) वापर कसा करू शकतो.

ginger benefits in monsoon season | बहुगुणी आले! पावसाळ्यात 'या' गंभीर समस्या दूर करतं चुटकीसरशी

बहुगुणी आले! पावसाळ्यात 'या' गंभीर समस्या दूर करतं चुटकीसरशी

Next

पावसाळा आणि वातावरण बदलामुळे विविध आजार सुरू होतात. व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, घसादुखी, ताप खोकला किंवा त्वचेशी संबंधित समस्या सुरू होतात. अनेकांना डेंग्यू, मलेरिया होण्याचीही भीती असते. यासाठी घरगुती उपाय म्हणून आलं उपयोगी ठरतं.

हेल्थलाइनच्या माहितीनुसार आलं अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक रोगांपासून संरक्षण देखील होते. जाणून घेऊया पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे किती फायदेशीर आहे आणि आपण त्याचा (Health Benefits Of Ginger During Monsoon) वापर कसा करू शकतो.

सर्दी-खोकला -
पावसाळ्यात खोकला आणि सर्दी ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत जेवणात आल्याचा जास्त वापर केल्यास किंवा रात्री झोपताना दुधात आलं मिसळून प्यायल्यास खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो.

सांधेदुखी कमी करतं
पावसाळ्यात अनेकदा सांधेदुखीची तक्रार असते. अशा परिस्थितीत पेन किलर घेण्याऐवजी आल्याच्या तेलानं मसाज केल्यास खूप फायदा होईल. जर तुम्ही जेवणात आल्याचं सेवन केलं तर त्यात असलेल्या दाह-विरोधी गुणधर्मामुळे सूज कमी होऊन वेदना कमी होतात.

केसांमधील कोंडा काढून टाकतं
पावसाळ्यात केस वारंवार ओले राहिल्यानं कोंड्याची समस्या वाढते. अशा वेळेस तुम्ही 2 चमचे किसलेलं आलं घ्या आणि त्यात 3 चमचे ऑलिव्ह तेल घाला. आता त्यात लिंबाचा रस घाला आणि केसांच्या मुळांना लावा. 15 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. असं आठवड्यातून दोनदा केलं तर कोंड्याची समस्या दूर होईल.

त्वचेवरील मुरुमं, पुरळ निघून जाईल -
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यानं त्वचा चिकट होते आणि मुरुम, पुरळ येणं अशा समस्या निर्माण होतात. यामध्ये आल्यामधील अँटिसेप्टिक आणि क्लींजिंग एजंट मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. यासाठी चहा, इतर काढे किंवा भाजीमध्ये तुम्ही आल्याचा वापर करू शकता.

पचनास मदत करतं
पावसाळ्यात अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मेडिकल न्यूज बुलेटिननुसार, जर दररोज कच्च्या आल्याचं सेवन केलं तर, पचन सुधारतं. एवढंच नाही तर, गॅससारख्या समस्याही दूर होऊ शकतात.

तोंडाच्या संसर्गास प्रतिबंध करा
आल्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडाच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात. हे हिरड्यांचे संक्रमण रोखण्यास देखील मदत करते.

Web Title: ginger benefits in monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.